अडपल्ली चक येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा….

0
104

पुनाजी कोटरंगे,
तालुका विशेष प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज सावली

दिनांक ०९ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही अडपल्ली चक या गावात मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे सर्वच विद्यार्थी तसेच गाववासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम पहा पहांदीपारो कुपार लिंगोच विशेष अतिथी म्हणून लाभलेले रामचंद्र शेडमाके, प्रकाशजी कन्नाके, राजू पाटील शेडमाके, वामनराव कन्नाके यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पटवारू जुमनाके, चंपत शेडमाके, विनोद गेडाम, सुभाष शेडमाके, रमेश मडावी, दिगंबर परचाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून कवी/लेखक प्रभाकर देविदास दुर्गे तर कार्यक्रमाचे सहाय्यक म्हणून गौरव उराडे हे होते. या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा तुळशीराम बावणे यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या अंतिम टप्यात आदिवासी गोटुल समिती व आदिवासी गोंड गोवारी युवा संघटना तर्फे अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी आदिवासी गोटुल समितीचे अध्यक्ष दिपकभाऊ शेडमाके, आदिवासी गोंड गोवारी युवा संघटनेचे अध्यक्ष आकाश नागोसे, सचिन राऊत, राहुल लोहट, प्रणय शेडमाके, शेखर पोरेते, स्वप्निल सुरपाम, शुभम ऊरेते, जितेंद्र परचाके, मयूर बावणे, इमरान पेंदोर, विकी शेडमाके, आकाश राऊत व समस्त गाववासीयांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here