कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नुकताच झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कांग्रेसचे युवराज बोरकर यांनी भाजपचे दिवाकर पुसतोडे यांचा पराभव करून युवराज बोरकर यांनी कांग्रेस चा गड कायम राखला आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कांग्रेस समथित पॅनल ने आपले वर्चस्व सिद्ध करीत सत्ता काबीज करून अशोक सांगूळले हे अध्यक्ष पदी विराजमान झाले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. दिनांक ८ ऑगस्ट २०२४ ला अध्यक्ष पदाकरिता निवडणूक घेण्यात आली यात कांग्रेस चे युवराज बोरकर हे निवडून आले व त्यांनी कांग्रेस चा गड कायम राखला.
याकरिता सिंदेवाही कांग्रेस शहर अध्यक्ष सुनील उट्टलवार, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका जयश्री कावळे, भात गिरणीचे संचालक विनायक कावळे,खरेदी विक्री सोसायटी चे उप सभापती विष्णुदास गजभिये, मधुकर बोरकर, अशोक तूम्मे तथा सर्व संचालक तसेच नगरसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

