prabodhini news logo
Home कविता आजची कविता – नवरी

आजची कविता – नवरी

0
147

शालू हिरवा नेसून
आज नवरी सजली
रूप आपले पाहून
गाली हळूच लाजली।।१।।

आली घटका जवळ
मन नाही थाऱ्यावर
लाज लाजेचीही लाली
आली तिच्या गालावर।।२।।

सुखी संसाराचे स्वप्नं
आज डोळ्यात दिसले
येता साजण सोबती
मन प्रसन्न दिसले।।३।।

चुडा हिरवा हातात
पायी पैंजण बांधले
दोन कुटुंबाला तिने
एका धाग्यात सांधले।।४।।

सुखी संसाराची स्वप्नं
आज दिसले अंगणी
ती ग परक्याचे धन
झाली माहेरी पाहुणी।।५।।

ओढ तिला सासरची
डोळे पाण्यानी भरले
तिचे जन्माचे माहेर
आज तिला दुरावले।।६।।

आली नवरी सासरी
माप ओलांडून घरी
लग्न सुखाचा सोहळा
सजला मंडप दारी।।७।।

कवियत्री प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here