
घरचा आधारस्तंभ
बाप पुजू हृदयात
झिजवली त्यानं काया
उभ्या कष्टाच्या घामात…..
दिन रात एक करी
सुखाच्या असे शोधात
बाप माझा रोज हसे
बनियानीच्या छिद्रात…..
झिजवतो बाप सदा
टाचा पायाच्या आनंदी
लेकरांना घडवतो
अंकुरली फुल फांदी…..
मोठ्या संकटाला सदा
बाप माझा आठवतो
उदरात माया त्याच्या
कधी कुणा दाखवतो…..
उन्हा तान्हात बाप रं
कष्टाच्या घामात भिजे
थकून भागून येता
शांत कोपऱ्यात निजे……
कवियत्री सारिका डी गेडाम
चंद्रपूर














