prabodhini news logo
Home चंद्रपूर “हर घर संविधान घर घर संविधान” अभियान ची सुरुवात १५ ऑगस्ट २०२४...

“हर घर संविधान घर घर संविधान” अभियान ची सुरुवात १५ ऑगस्ट २०२४ रोजी होणार

0
182

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन , बल्लारपूर तालुका व शहर तर्फे आयोजित २६/११/२०२४ रोजी संविधान दिनाला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत.
या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने “हर घर संविधान घर घर संविधान” अभियान ची सुरुवात १५ ऑगस्ट २०२४ रोजी बल्लारपूर शहरातून होणार आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

या अभियानाच्या अंतर्गत, संपूर्ण बल्लारपूर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, जे २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत चालतील. या काळात संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, रॅली आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

कार्यक्रमात शाळा, महाविद्यालये, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे. अभियानाचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत भारतीय संविधानाचे महत्व पोहोचवणे आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचे महत्व नागरिकांना पटवून देणे आहे.

सर्वांना या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून संविधानाचे महत्व आणि त्याचे पालन करण्याची जाणीव प्रत्येकाला होईल.

दिनांक :- १५ ऑगस्ट २०२४ रोजी
स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा बल्लारपूर, जुनी नगरपरिषद चौक,बल्लारपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here