रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ब्रम्हपूरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या संघटकपदी अतुल राऊत यांची तर अनुसूचित जमाती सेलच्या तालुकाध्यक्षपदी मोरेश्वर ऊईके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत त्यांना ब्रम्हपूरी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सदरच्या नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत.
अतुल राउत हे ब्रम्हपूरी शहरातील टिळकनगर येथील रहिवासी असुन मोरेश्वर ऊईके हे तालुक्यातील चोरटी येथील रहिवासी आहेत. काॅंग्रेस पक्षाचे विचार समाजातील सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे कार्य हे दोघेही करीत असुन त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची सदर पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राजेश कांबळे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, कृउबा संचालक किशोर राऊत, अॅड आशिष गोंडाणे, पथविक्रेता संघाचे पदाधिकारी रविंद्र पवार यांसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

