
अश्विनी कोटमे महिला जिल्हा प्रतिनिधी नाशिक – आज १६ ऑगस्ट रोजी पेठ तालुका येथे पेठ पोलीस ठाणे यांना दारूबंदी साठी निवेदन देण्यात आले. शिंदे ,लिंगवणे,भोकर्डीफाटा आड पाटे, करंजाळी, काही परिसरातील अवैध दारू सरास विक्री होते या त्रासाला कंटाळून 50 हुन.आधिक महिलांनी पेठ पोलिस ठाणे पेठ यांना निवेदन देऊन त्वरित दारू धंदा बंद करण्यात यावा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यावर तात्काळ पोलिस फिरते पथक नेमून संबंधित दारू विक्री जो कोणी व्यक्ती दारू विक्री करत असताना आढळल्यास त्याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि कायमची बंदी घालण्यात यावी.
पेठ तालुका हा मागासवर्गीय तालुका आहे येथे रोजगार उपलब्ध नसल्याने रोजगारांसाठी स्थलांतर काही यांना बाहेरगावी जावे लागते बाहेरून जे काही मोलमजुरी करून काही पैसे कुटुंबासाठी आणले जातात ते पैसे प्रपंच करिता व मुलांच्या शिक्षणासाठी खर्च न करता काही पुरूष वर्ग गावातच दारू मिळते म्हणून कुठलाही विचार न करता सर्व पैसे दारूत खर्च करून टाकतात त्यामुळे काहींचे संसार उध्वस्त होत आहेत त्या दारूच्या कंटाळा वैतागून काही महिलाचा मोठ्या प्रमाणात संसार उध्वस्त होत आहे त्यामुळे महिला अशा गोष्टींचा विरोध करतात तीला सुध्दा दारूच्या नशेत मारहाण पुरुष मंडळ करतात म्हणून या सर्व गोष्टी थाबल्याच पाहिजे म्हणून आज पेठ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांनी पेठ पोलिस स्टेशन मधे निवेदन दिले व तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली यावेळी उपस्थित भास्कर हाडस जनार्दन तुंबडे सुमन फसाळे रंजना गवळी कमल भोये अश्विनी कोटमे लता टोपले राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे माहिती अधिकार उपाध्यक्ष सोपान पवार पेठ तालुक्यातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..














