मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांना लाडक्या बहिनीकडून एक छोटीसी भेट..!
शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी दाखवली हिरवी झेंडी!
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपुर :- जिल्हा परिषद, चंद्रपुर प्रवेशद्वार येथून उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेमधील चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदच्या महिला व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे भाऊसाहेबांना आपल्या लाडक्या बहिनीकडून रक्षाबंधनाच्या दिनी एक छोटीसी भेट म्हणून 1 लाख राख्या सोबत घेवून शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी हिरवी झेंडी दाखवून मुंबईला रवाना केले.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर, शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, महानगर प्रमुख भरत गुप्ता, वैद्यकिय कक्ष प्रमुख जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, दिपक कामतवार हे सुद्धा उपस्थित राहून उमेदच्या महिला व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत मुंबईला रवाना केले.
लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरणासाठी टाकलेलं एक पाऊल म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानाचे सक्षमीकरण व लाडकी बहीन योजना राबविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खुप खुप आभार मानत जिल्ह्यातील लाडक्या बहिनीकडून रक्षाबंधनाच्या दिनी 1 लाख राख्या घेवून भाऊसाहेबाला एक छोटीसी भेट म्हणून आज मुंबईला रवाना झाल्या.

