prabodhini news logo
Home यवतमाळ आजचा लेख बंध रेशमाचे

आजचा लेख बंध रेशमाचे

0
134

रक्षाबंधन म्हटलं की बहीण भावाच्या नात्यातला गोडवा आठवतो, खर तर खुप नाती असतात जीवनात पण प्रत्येक नात्याची एक मर्यादा असतेआणि त्यातून बहीण भावाचं नातं मर्यादा जपूनही अमर्यादित असतं.
ज्याच्या सोबत कळत नाही तेव्हा पासून तर सर्वच कळतंय इथपर्यतचा प्रवास अगदी हसत, खेळत,रडत, भांडत, पुर्ण होतो तो भाऊ असतो.. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला स्वतःपेक्षा जास्त जपतो, स्वतःच्या सुखाचा विचार न करता अगोदर तीच सुख पहातो, आणि बहिणही किती आनंदात असो तिला कळजी असते ती तिच्या भावाची, हे नातं हे बंध खूप मजबूत असतात म्हणून त्याला मायेच्या. प्रेमाच्या साखळीने गुंफुन ठेवायचे असतात….
रक्षाबंधन काहीतरी ऐतिहासिक गोष्टीवरून साजरा होणारा सणं आहे पण आज खरंच गरज आहे नात्याची या नात्यातल्या पवित्र्याची जर सर्वांच्या मनात या नात्याविषयी थोडी जरी सकारात्मकता आली तर 70%गुन्हेगारी कमी होईल, भाऊ हा फक्त्त रक्ताच्या नात्याचा असावा अस काही नसतं. तो बस मनातून नातं निभावणारा असावा कारण सर्व नात्यापेक्षा बहीण भावाच्या नात्यात एक वेगळीच ओढ असते, एकमेकांच्या आनंदात, सुखात, दुःखात कोणी नसेल सोबती तरी बहीण भाऊ कायम सोबत असतात. मैत्रीचा खरा बंध पण याच नात्यातून सुरु होतो आणि शेवटी याच नात्यावर येऊनही थांबतो, आई नंतर भावासाठी दुसरी आई बनते ती बहीण असते, आणि वडिलांनंतर जो तीचा आधार बनतो, तिच्या पाठीशी भक्कम उभा रहातो तिच्यासाठी सर्व सहन करतो
तो फक्त्त तीचा भाऊ असतो आयुष्याच्या वळणावर सर्वात भावनामय नातं हे बहीण भावाचं असतं. बहिणीसाठी जो सर्व जगाशी लढतो,, आणि भावासाठी ती सर्व जगासमोर हार मानते अश्या अप्रतिम नात्याला आयुष्यभर काळजातून सांभाळलं पाहिजे.
रक्षाबंधनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा

लेखिका सौ. सीमा गाडेकर
यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here