लाडकी बहिण योजने प्रमाणे लाडकी बहिण सुरक्षित योजना राबवावी

0
148

महिला, मुली यांना स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची रक्षबांधनची भाऊ परवानगी भेट देणार का..? – लक्ष्मण कांबळे

औसा प्रतिनिधी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी या भारत देशातील एक नागरिक या नात्याने आपनाकडे विनंती करतो की आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली तसेच लाडकी बहिण सुरक्षित योजना राबवावी कारण या स्वतंत्र देशात गुलाम नेते जास्त झालेत साहेब आपल्या योजनेचे मी स्वागत करतो.
या योजेनेतून महिलांना बहिणींना थोड्या फार प्रमाण आर्थिक मदत होत आहे हे जरी सत्य असले तरी त्या बहिणींनी सध्याच्या काळात आर्थिक मदतीपेक्षा सुरक्षित मदतीची जास्त गरज आहे कारण आज घडीला दररोज कुठे ना कुठे बलात्कार, जिवंत जाळले, जाते अशा प्रकारे बहिणीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडता आहेत या घटनेतील आरोपी मात्र समाजात ताठ मान वर करून फिरताना दिसतायेत या मुळे शाळकरी मुली, कामावर जाणाऱ्या महिला, प्रवास करत असताना या बहिणींनी किती किळसवाणा प्रकराला सामोरे जाऊन जीवन जगतात हे .त्या बहिणींनीनाच माहीत .त्यामुळे येणार काळ हा फार विचित्र असणार आहे .त्यामुळे माननीय साहेबांनी महिलांच्या बाबतील सुरक्षित कायदे कडक करून महिलांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांना स्व स्वरक्षनसाठी हत्यार बाळगण्याची परवाना दिला पाहिजे. जेणेकरून लाडक्या बहिणीवर दिवसा ढवळ्या होणारे अन्याय आत्यचार थांबतील.हत्यार जवळ बाळगण्याची परवाना असल्या मुळे तुम्हा , आम्हाची ,लाडकी बहिण,आई सुरक्षित रहील अशी आशा बाळगून मी लक्ष्मण कांबळे आपना कडे ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदना द्वारे मागणी करत आहे.

या पुढे महिला, बहिणींनी वरील अन्याय अत्याचार थांबवायचे असतील तर त्या महिला बहिणींना स्व स्वरक्षणासाठी हत्यार जवळ बाळगण्याची परवानगी द्यावी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here