स्वयंरोजगार विभागात (एम्प्लॉयमेन्ट) नोंदणी घेऊन सुशिक्षीत बेरोजगार युवकांना ५ हजार रुपये महिण्या पोटी मानधन द्यावे

0
79

शिवसेना (ऊ. बा. ठा.) ची मागणी

राहुल वासनिक जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली- गडचिरोली- लाडकी बहीण योजना काढून अनेक बहिणींना पंधराशे रू.महिना पोटी राज्य शासन देत आहे .परंतु अनेक शिक्षण घेऊन सुशिक्षीत बेरोजगार नौकरी कामा धंद्या अभावी बेरोजगारी चे जीवन जगत आहे, महाराष्ट्रात लाखो च्या संख्येने बेरोजगार आहेत आपल्या गडचिरोली जील्हातही बेरोजगारांची संख्या कमी नाही.वर्षातून एक दोन वेळेसच नौकरीची जाहिरात निघते हजारो बेरोजगार युवक नौकरी करिता फॉर्म भरतात आणि बोटा वर मोजण्या इतके उमेदवारांची निवड होते, निवड न झालेले हजारो युवक बेरोजगारीचे जीवन जगत असतात काही वर्षा पूर्वी सुशिक्षीत बेरोजगार करिता एम्पलायमेंट कार्यालय होते तिथे आपल्या शिक्षण पात्रतेची नोंदणी करून मुलाखत पत्र यायचे विविध नौकरी आणि ट्रेनिग करिता मुलाखती द्वारे निवड व्ह्यायचे आणि ज्यांची निवड झाली नाही त्यांना मानधन द्यायचे किवां अंशकालीन कर्मचारी म्हणून विविध विभागात नियुक्त व्ह्यायचे आणि त्या त्या कार्यालयातून मानधन मिळत असे .आता सर्व ऑनलाईन झाल्याने ते सर्व बंद झाले .शिक्षणात बेरोजगारांचे लाखो रुपये खर्च झाला आहे नौकरी वीणा वन वन भटकत आहे,सूरजागड सारखा मोठा प्रकल्प असून शिक्षित बेरोजगार युवकांना घेण्यात येत नाही बाहेर राज्यातील युवकांचा भरणा आहे तरी बेरोजगार युवक कोणत्या कठीण प्रसंगात जगत आहेत याचा विचार करून पुनःश्च एम्पालायमेंट कार्यालयात बेरोजगारांची नोंदणी करवून घेऊन पाच ते सात हजार महिन्या पोटी मानधन द्यावे अशी मागणी महाराष्ट्र शासनाला शिवसेना जिल्हा प्रमुख (आरमोरी विधान सभा क्षेत्र )सुरेंद्र सिंह चंदेल .उप जिल्हा प्रमुख अविनाश गेडाम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here