प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गायक प्रणय गोमाशे हे मूळचे आपल्या विदर्भातील चंद्रपूर चे असून स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य पदवीउत्तर शिक्षण पूर्ण केले, त्या दरम्यान ते नागपूर विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे पुढे संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.
मुंबई विद्यापीठ संगीत विभाग माजी विद्यापीठ प्रमुख व जयपूर घराण्याचे जेष्ठ गायक पंडित मुरलीमनोहर शुक्ला गुरुजी यांच्या कडे गायकी ची तालीम घेत सुप्रसिद्ध गायक डॉ. सुरेश वाडकर,राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे इ.यांच्या मार्गदर्शन त्यांना लाभले. आणि मुख्य म्हणजे प्रणय ने संगीत विषय घेऊन पदविका पुर्ण केलीय(MA music). विविध राज्य स्तरीय गायन स्पर्धा,जागतिक सांस्कृतिक महोत्सव,विविध राज्यात गायनाचे कार्यक्रम इ.ठिकाणी आपली कला सादर करून विविध सामाजिक संघटना मार्फत देण्यात येणारे “युवा पुरस्काराने” सन्मानीत आहेत. मुंबई येथील प्रसिध्द PRANAY G MUSICIANS AND BAND चे मुख्य गायक आहेत मुंबई च्या व इतर स्थानिक कलाकारांनी मिळून मराठी, हिंदी, वेस्टर्न, संगीताच्या वेगवेगळ्या तर्हा लोकांसमोर नव्याने सादर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जुण्या गाण्यांच्या संयोजनाला धक्का न लावता आधुनिक वाद्यांचा वापर,त्यांच्या बॅन्ड ला युनिक बनवते, म्हणूनच कमीत कमीम वेळेत जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवणारा हा एकमेव संगीत संच आहे. साध्यावत मुंबई मधील असे कोणतेच व्यासपीठ नाही जिथे PRANAY G बॅंड ने सादरीकरण केले नसेल,संपूर्ण मुंबईतच नवे तर विदर्भातील अनेक शहरात, महाराष्ट्रातील नाशिक,पुणे, देशातील इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर बंगलोर येथे आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्या पुढे गाण्याची संधी मिळाली, गोवा सरकार आयोजित “गोवा महोत्सव” मध्ये सुद्धा यांनी प्रसिद्धी मीळवलीय अश्या अनेक मेट्रो शहरात यांची हॉउसफ़ुल्ल कार्यक्रम आजवर झालेली आहेत.
विदर्भातील आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज सेवा संस्थान शेगाव येथे समाधी मंदिर पुढे दर वर्षी भजन सेवा सादर करत असून,बीड येथील प्रसिद्ध भगवान गढ/ नारायण गढ येथे 2 लक्ष जनसमुदाय पुढे सुप्रसिध्द भजन सम्राट श्री.आदिनाथजी सटले गुरुजी ह्यांना साथ संगत करायची संधी त्यांना मिळाली, भारतातील मुंबई येथील सुप्रसिद्ध देवस्थान सिद्धीविनायक मंदिर,पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ, अक्कलकोट येथे सुद्धा गायन सेवा केली आहे.17 जुलै ला आषाढी एकादशी ला बँगलोर पुटपरती येथील श्री.सत्य साई बाबांच्या मुख्य समाधी पुढे लाखों भाविकांच्या उपस्थितीत प्रणय गायन केले आहेत तर जगातील 120 देशात हा कार्यक्रम लाईव्ह बघितल्या गेला,
महाराष्ट्र पोलीस अधिकारी मंडळ मुंबई ह्याच्या साठी खास कार्यक्रम चेंबुर मुंबई येथे सादर केला आहे.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रमात आपली कला सादर केली आहे.
यशवंतराव चव्हाण ज्ञान प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे महाराष्ट्र पोलीस महासंचालक (DGP) यांच्यापुढे वर्धापन दिन सोहळ्यात सादरीकरण केले आहे.
त्याव्यतिरिक्त प्रणय गोमाशे हे मुंबईच्या समाजभारती या त्रैमासिक अंकाचे ते सह-संपादक असून मुंबई मध्ये विदर्भातून येणाऱ्या होतकरू लोकांसाठी ४० वर्षापासून समाजसेवेचं कार्य करणाऱ्या “विदर्भ युवक मंडळ कल्याण” चे ते सह कोषाध्यक्ष,अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ शाखा कल्याण चे सहसंघटन सचिव म्हणून कार्यरत आहेत.
चांगल संगीत सर्व सामान्य पर्यंत पोहोचवणे आणि त्या मार्फत समाजात शांती आणि प्रेम निर्माण होईल ह्यासाठी संगीत मध्ये भविष्यात PhD करीत आहेत.संगीताचे विविध वर्ग ते चालवतात शिवाय संगीत ध्यान साधनेच्या माध्यमातून मनःशांती कशी मिळवायची ह्यावर त्यांचे प्रात्यक्षिक सध्या प्रसिध्द आहे.
समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींनी त्यांच्याशी जुळून आंतरिक शांती ची अनुभूती घेतली आहे.सध्या आँनलाईन/ऑफलाईन संगीत अकादमी च्या माध्यमातून अनेक लोकांनी संगीताचे धडे प्रणय कडून घेतले आहेत.
गायक प्रणय स्वतः वारकरी संप्रदायातील असून,
जास्तीत जास्त वारकरी संप्रदायात तरुण मुला-मुलींनी यावं आणि समाजात संतांचे विचार भजन कीर्तनाच्या माध्यमातून अंगीकृत करावे याकरिता महाराष्ट्राभर ते विविध वारकरी उपक्रमांच्या माध्यमातून मोहीम चालवतात.
नुकताच सुप्रसिध्द गायक पद्मश्री शंकर महादेवन संगीत दिग्दर्शित संगीत वेब सीरिज “बंदिश ब्यांडीट 2” मध्ये प्रणय ची निवड झाली असून त्याचे शूटिंग सुद्धा पूर्ण झाले आहे लवकरच मोठ्या पडद्यावर प्रणय च्या संपूर्ण टीम सहित भारतातील सर्वोत्कृष्ट बँड म्हणून ते झळकणार आहेत.
त्याकरिता नेटफलिक्स आणि अँमेझॉन यांनी त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतला आहे.
प्रणय ने झी मराठी चॅनेल वरील सुप्रसिद्ध विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या तिल कलाकारां सोबत महाराष्ट्रातील विभिन्न ठिकाणी हाऊस फुल लाइव परफॉर्मन्स दिलेला आहे,
झी मराठी चॅनेल वरील जाऊ बाई गावात या रिऍलिटी शो मध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता हार्दिक जोशी हा सूत्रसंचालक म्हणून होते तर सुप्रसिद्ध गायक श्री.आनंद जी शिंदे, संगीत दिग्दर्शक “एक पोरगी” फेम श्री.मनोहर गोलंबरे ह्यांच्या प्रणय ने सहगायान केले, झी मराठीवरील जाऊ बाई गावात च्या अंताक्षरी स्पेशल एपिसोड ची सुरुवात प्रणय गोमाशे यांच्या सूर निरागस हो या गाण्याने झाली,असून
आता लवकरच आपणा सर्वांच्या भेटीला पुनश्च एकदा सन मराठी टीव्ही चॅनेल वर नवा कोरा करकरीत कार्यक्रम ज्याच नाव आहे “होऊ दे चर्चा,कार्यक्रम आहे घरचा” ह्या कार्यक्रमात दर रविवारी रात्री 9 वाजता sun मराठी चॅनेल वर आपल्याला टीव्ही वर दिसत आहेत.
सुमारे 45 वर्षापासून विवीध उपक्रमात कार्यरत असणाऱ्या विदर्भातील लोकांसाठी सेवाभावी असलेली संस्था “विदर्भ युवक मंडळ कल्याण” च्या वतीने “विदर्भ भूषण पुरस्कार जाहीर झाले आहे,
ह्या संपूर्ण कार्याची दखल घेऊन गायक प्रणय गोमाशे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.
25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सरदार पटेल महाविद्यालयात होणार भव्य पुरस्कार वितरण सोहळा.

