टोलनाक्यावर दुचाकी वाहनाकरीता रस्ता उपलब्ध करून देऊन ठिकठिकानी पडलेले खड्डे तात्काळ दुरस्त करा

0
71

मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार आणि मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांची निवेदनाद्वारे मागणी

पुनाजी कोटरंगे विशेष तालुका प्रतिनिधी, सावली- मूल ते गडचिरोली या महामार्गावर हिरापूर जवळ टोलनाका उभारण्यात आला असून या टोल नाक्यावर दुचाकी वाहनाकरीता रस्ता नाहि तसेच टोलनाक्याजवळ ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत यामूळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही टोकनाका व्यवस्थापकाच्या हलगर्जी पनामुळे पंधरा दिवसाआधी एका व्यक्तीला अपघातात जीव गमवावा लागला होता अशा विपरीत घटणा वारंवार घडु नयेत यासाठी टोलनाक्याजवळ पडलेले खड्डे तास्काळ दुरस्त करूण दुचाकी वाहनाकरीता बाजूने रस्ता उपलब्ध करून द्यावे आठ दिवसात सदर मागणी पूर्ण न झाल्यास मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येणार असून याला सर्वस्वी संबंधीत प्रशासन जबाबदार असेल या आशयाचे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या मार्गदर्शनात टोलनाका व्यवस्थापकाला देण्यात आले असून निवेदन देण्यार्या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे मनसेचे मूल तालुका अध्यक्ष स्नेहल झाडे, शुभम वांढरे, मंगेश धोटे, निक्की यादव, प्रशांत रामटेके, शंकर भडके आणि मनसे तथा मनविसे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here