खाटीक समाज भवनाचे भूमिपूजन
उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – अमरावती – खाटीक समाज परिवर्तन संघटना अमरावती, सर्व शाखा, महिला कार्यकारिणी शाखा यांच्या वतीने जुना बाय पास, बडनेरा रोड येथे समाजा साठी मिळालेल्या जागेवर समाज बांधवांच्या उपस्थितीत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक शालिकराम पारवेकर समाज बांधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे,कृष्णरावजी पारडे माजी प्राचार्य,प्रा. डॉ.ताराचंद्र कंटाळे,जि.प.सदस्य डोईफोडे,माजी नगरसेविका वंदना हरणे,महिला अध्यक्ष प्रिया नेहर यांची विशेष उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आ.रवी राणा बडनेरा मतदारसंघ यांच्या हस्ते प्रस्तावित खाटीक समाज भवनाचे भूमिपूजन,फलक अनावरण तसेच कविवर्य कृष्णरावजी पारडे यांच्या काव्यपुष्प पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी सूत्रसंचालन सचिव मोहन नेहर यांनी केले तर प्रा.डॉ.ताराचंद कंटाळे यांनी आपले विचार व्यक्त करून समाजासाठी जागा व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रवी राणा यांचे आभार मानले,आपल्या भाषणात रवी राणा यांनी खाटीक समाजाच्या विद्यार्थ्यां करिता वसतिगृहासाठी अजूनही निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले,
याप्रसंगी संजय माहुरकर, डॉ.श्रीकृष्ण कंटाळे, डॉ.विठ्ठल कंठाळे ,विजय हरणे, माणिक नेहर,रामेश्वर माहुरकर, सतीश माहुरे,गजानन कंटाळे,भास्कर माहुरकर, सुभाष लोणारे,प्रा मनोहर पारवे, सुरेश माहुरे, सुधाकर कंटाळे, राजकुमार दुर्गे,शालीकराम कंटाळे, संतोष हरणे,सतीश हरणे,संतोष रावेकर,धनंजय लोणारे,उमेश ढोणे,महिला प्रतिनिधी नीता धनाडे, अरुणा माहुरे,सरिता मदने, अर्चना कंटाळे,सोनल धनाडे, शारदा पारवे, रंजना पारवे,मीना कंटाळे, सुमन लोणारे,संगीता दुर्गे,लता डोळे, प्रतिभा कंटाळे,कमला माहुरे, प्रियंका मंडवे, आचल गुजर, नीलिमा डोफे,संगीता पारवे, नम्रता पारवे, अर्चना पारवे, सारिका कंटाळे, प्रीती पारवे, शीतल पारवे तसेच समाज बांधव यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेच्या बेलपुरा, महाजनपुरा, बडनेरा, रिद्धपुर, पूर्णानगर,नांदेड ब., मोर्शी, वाठोडा शुकलेश्वर,धामणगाव गढी, अचलपूर ईत्यादी शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

