बल्लारपूर मनसे महिला सेना,कल्पना पोतर्लावार कडून पोलीस दलात रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर- बल्लारपूर – बहिन भावाच्या नात्यातील पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन बहिन भावाला राखी बांधत स्वतःच्या रक्षणाचे वचण घेत असते याच पवित्र सणाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा चंद्रपुर जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनचे प्रमुख मार्गदशनात बल्लारपूर महिला सेना तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात बल्लापुर पोलीस दलात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सोहळा साजरा बल्लारपूर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री. सुनील गाडे सर व सहकारी पोलीस बांधव चोवीस तास आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात दिवसेंदिवस महिलांवर होणारे मानसीक तथा शारीरीक अत्याचार हे नष्ट होऊन महिलांना स्वातंत्रपणे फिरता यावे कोलकत्यात आताच एका डॉक्टर महिलेवर अत्याच्यार करूण तिची निघृण हत्या करण्यात आली..
बल्लारपूर शहारातच नव्हे तर चंद्रपूर शहरात देखील दिवसा ढवळ्या गोळीबार झाला या सर्व गूणेगारीवर पोलीस प्रशासणानी गांभीर्याने लक्ष वेधून महिलावर होणारे अत्याच्यार आणि गुन्हेगारी यावर आळा घालावा आणि आया बहिनी स्वातंत्र्यपणे संचार करुण सुरक्षीत राहावे आपले कार्य अधिकाअधिक प्रबळ व्हावे यासाठी मनसे महिला सेनेनी पोलीस बांधवांना राखी बांधून वचनबद्ध केले. या निस्वार्थ भावणेणी बल्लारपुर महिला सेनेनी बल्लारपूर महिला सेना तालुका अध्यक्षा कल्पना पोर्तलावार यांच्या उपस्थीतीत पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळेस रंजीता गेडम, राणी दुस्सावार, सपना धनपाल ब्राह्मणे, शिका आशिष दास, उषा वाकडे, सुनिता कायरकर, ज्योती रामदेव वानखेडे, प्राची कोरला तथा महिला उपस्थित होते.

