prabodhini news logo
Home चंद्रपूर सिंदेवाहीत आज बंदच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

सिंदेवाहीत आज बंदच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

0
160

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

अनुसूचित जाती , जमाती प्रवर्गाच्या आरक्षण उपवर्गिकरणाच्या विरोधात आज संपूर्ण भारत बंद करण्यात आला असून त्या अनुषंगाने सिंदेवाही तालुक्यात सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तरी सिंदेवाही शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापले दुकाने, प्रतिष्ठाने,बंद ठेवून या बंदच्या आंदोलनाला सहकार्य करावे. तसेच तालुक्यातील संपूर्ण अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या महिला पुरुषांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्काच्या लढ्याला साथ द्यावी. असे आवाहन प्रसिद्धी मध्यामातून करण्यात येत आहे.
अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गाचे अ ब क ड असे उपवार्गिकरण करून सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलेयरची अट घातली आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील अनुसूचित जाती जमाती च्या आरक्षणावर गदा येणार असून या निर्णयाच्या विरोधात २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारत बंद करण्यात येत आहे. या भारत बंदच्या लढ्यात सिंदेवाही तालुका सहभागी असून आज सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजता पर्यंत शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुपारी दोन वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. व उपस्थित सर्व नागरिक तहसील कार्यालय येथे जावून तहसीलदार यांना निवेदन सादर करणार आहेत. त्यानंतर काही मान्यवर कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्त करून आंदोलनाचा समारोप करण्यात येतील. या आंदोलनात आंबेडकरी विचाराशी बांधिलकी असणाऱ्या सर्व संघटना, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, तसेच आदिवासी समाजाच्या सर्व संघटना सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here