prabodhini news logo
Home चंद्रपूर रमाला तलावातील पाण्यामुळे पूरस्थिती, पक्का नाला न बनवल्यास आंदोलनाचा इशारा – आप

रमाला तलावातील पाण्यामुळे पूरस्थिती, पक्का नाला न बनवल्यास आंदोलनाचा इशारा – आप

0
226

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक, चंद्रपूर – रमाला तलावाच्या पाण्याच्या पातळीतील वाढीमुळे, बगड खिडकीच्या मागे वाहणाऱ्या नाल्याचा पाणी वार्डात घुसून वारंवार पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून पक्का नाला बनवण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने अनेक वेळा महानगर आयुक्तांकडे करण्यात आली, परंतु आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

आज आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा आयुक्तांना निवेदन देऊन नालेबंदीची मागणी केली. जर या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संदर्भात आम आदमी पार्टीच्या महिला महानगर अध्यक्ष तब्बसूम शेख यांनी सांगितले, “रमाला तलावामुळे होणारी पूरस्थिती नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने तातडीने पक्का नाला बांधण्याची कारवाई करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही झगडत राहू..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here