नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

0
81

सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – त-हाडी -ऑल इंडिया सेन समाज ट्रस्ट, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या माध्यमातून नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ऑल इडिया सेन समाज ट्रस्ट नई दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोहर खोंडे, व प्रमुख अतिथि म्हणून शिरपुर पंचायत समिति चे गट विकास अधिकारी संजय सोनवने,बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली निकम,महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे धुळे जिल्हा सचिव बी.के.सूर्यवंशी,अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगारे, दिसान टेक्सटाइल ग्रूप चे जनरल मॅनेजर शरद फूलपगारे, नाभिक मंच चे संपादक भगवान चित्ते, महाराष्ट्र नाभिक कर्मचारी संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष दिलीप ईशी, राष्ट्रीय जनसेवा पक्ष चे धुळे जिल्हा अध्यक्ष गोकुळ ईशी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे ज्येष्ठ सल्लागार रामचंद्र पवार,महाराष्ट्र नाभिक महामंडळ च्या महिला जिल्हा अध्यक्षा हेमलता येशी, उपाध्यक्षा पल्लवी शिरसाठ, कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा रंजना सूर्यवंशी, महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे धुळे शहर अध्यक्ष दत्तात्रय सैंदाणे,वास्तु तज्ञ भालचंद्र वाघ, वास्तु तज्ञ पद्माकर शिरसाठ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विशाल चित्ते, युवक संगठक ,धनराज पगारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संत सेनाजी महाराज,शूरवीर जिवाजी महाले यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांपेकी ५ गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान पत्र, फोल्डर फाईल, बुके आणि तीन – तीन हजार रुपयांचा धनादेश देवून गौरविण्यात आले, व उर्वरित ६० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान पत्र फोल्डर फाईल , व बुके देऊन सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना धनराशी चा लाभ देण्यासाठी जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी १५००० रुपयांची, बक्षीस वितरण साठी दिसान टेक्सटाइल ग्रूप चे जनरल मॅनेजर शरद फुलपगारे यांनी ६००० रुपयांची, जेवणाची सोय साठी आल इंडिया सेन समाज ट्रस्ट नई दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनोहर खोंडे यांनी ५१०० रुपयांची, गट विकास अधिकारी संजय सोनवणे यांनी ५१०० रुपयांची, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली निकम यांनी २१०० रुपयांची,प्राथमिक शिक्षक जितेंद्र सनेर यांनी २१०० रुपयांची, एल.आय.सी ऑफ इंडिया चे विमा प्रतिनिधी संजय वरसाळे यांनी ११०० रुपयांची, लोकी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गोपाल सैंदाणे सर यांनी ११०० रुपयांची भरीव मदत केली असून उर्वरित आर्थिक स्वरूपाची मदत जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून मिळाली आहे.

कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांनी केले होते.
कार्यक्रमात आर.एन पवार, सी.के. महाले, एल.डी.वारुळे, रवींद्र खोंडे, नामदेव अहिरे, नंदकुमार बोरसे, दीपक वरसाळे संजय वरसाळे, गोपाल वरसाळे,सुधाकर वारुळे, प्रकाश जगताप, गिरधर शिरसाठ,पांडुरंग शिरसाठ,अंबालाल पवार, गणेश ईशी,गोपाल सैंदाणे, राजेश शिरसाठ,प्रताप सोनवणे, दीपक जाधव, विश्वनाथ अहिरे,आदी मान्यवर समवेत नाभिक समाज बांधव आणि विद्यार्थी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सेन यांनी केले व आभार प्रदर्शन जितेंद्र सनेर सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here