अंडवृद्धी व हत्तीरुग्ण शोध मोहिमेला सहकार्य करा

0
62

जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी व हत्तीरोग अधिकारी दिनेश भगत यांचे आवाहन

उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक प्रबोधिनी न्युज – अमरावती जिल्ह्यात 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान अंडवृद्धी व हत्तीरुग्ण शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना खरी माहिती देऊन सहकार्य करावे व हत्तीरुग्ण असेल तर व्यायाम व डी.ई.सी गोळ्या घेऊन त्रास कमी करता येतो व अंडवृद्धी असेल तर शस्त्रक्रिया करून कायमस्वरूपी उपाययोजना करता येते.
हत्तीरोग हा डासांपासून मानवाला होणारा रोग आहे. यामध्ये पाय,हात हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालचाल करणेही अवघड जाते. हत्तीरोग हा शरीर विद्रुप करणारा रोग असल्यामुळे यावर वेळीच प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यामुळे 16 ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान ही शोध मोहीम संपूर्ण अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. वरील लक्षणे दिसल्यास आपल्याकडे येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी.
हत्तीरोग हा ‘क्युलेक्स’ प्रजातीच्या डासांपासून पसरतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार क्लुलेक्स डास हत्तीरोगास कारणीभूत ‘बुचेरिया बॅनक्रॉफ्टीया’ या परजीवी जंतूंचा प्रसार करतात.

रोगप्रसाराचे माध्‍यम
दुषित डास चावल्‍यामुळे हत्‍तीरोगाचा प्रसार होतो. (क्‍युलेक्‍स प्रकारचे डास बुचेरेरिया बॅनक्रॉप्‍टीया हत्‍तीरोगाच्‍या परोपजीवी जंतूचा प्रसार करतात.) दुषित डास मनुष्‍याला चावा घेतेवेळी त्‍या ठिकाणी हत्‍तीरोगाचे जंतू सोडतो. हा जंतू त्‍या ठिकाणाहून किंवा अन्‍य ठिकाणाहून त्‍वचेतून शरीरात प्रवेश मिळवितो आणि लसीका संस्‍थेमध्‍ये जातो.

अधिशयन काळ
हत्‍तीरोगाच्‍या संसर्गजन्‍य जंतूच्‍या शरीरातील प्रवेश आणि मायक्रोफायलेरिया रक्‍तात सापडणे. या कालावधी विषयी निश्चित माहिती उपलब्‍ध नाही तथापि, हत्‍तीरोगाच्‍या संसर्गक्षम जंतूचा शरीरातील प्रवेश आणि आजाराची लक्षणे दिसण्याचा कालावधी हा ८ ते १६ महिन्‍यांचा असतो.

लक्षणे व चिन्हे
रोग लक्षणाच्या ४ अवस्‍था असतात.
जंतू शिरकावाची अवस्‍था- यामध्‍ये आजाराबाबत लक्षणे दिसू शकतात.
लक्षणविरहीत अवस्‍था / वाहक अवस्‍था – यामध्‍ये रुग्‍णांचा रात्रीच्या रक्‍तनमूना तपासणीत मायक्रो फायलेरिया (mf) आढळून येतात मात्र रुग्‍णांमध्‍ये रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्‍हे आढळून येत नाहीत.
तीव्र लक्षण अवस्‍था- या अवस्‍थेमध्‍ये ताप, लसीकाग्रंथीचा दाह, लसीकाग्रंथीना सूज तसेच पुरुषांमध्‍ये वृषणदाह इ. लक्षणे दिसून येतात.
दिर्घकालीन संसर्ग अवस्‍था- या अवस्‍थेमध्‍ये हात, पाय व बाहय जननेंद्रियावर सूज, अंडवृध्‍दी इ. लक्षणे दिसतात.

निदान
हतीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रात्री ८.३० ते १२ दरम्‍यान रक्‍तनमूना घेऊन तपासणी केल्‍यानंतर हत्‍तीरोगाचे निदान करता येते.

औषधोपचार
ज्‍या रुग्‍णांमध्‍ये मायक्रो फायलेरिया आढळून येतात. अशा रुग्‍णांना डीईसी (डायइथील कारबामाझाईन) या गोळया ६ मिलिग्रॅम प्रतिकिलो शरीराचे वजन (प्रौढ व्यक्‍ती ३०० मिलीग्रॅम ) या प्रमाणात १२ दिवस देण्‍यात येतात.

व्‍यवस्‍थापन
रुग्‍णांने पायाची स्‍वच्‍छता करणे आणि काळजी घेणे तसेच शारीरिक व्‍यायाम करणे हे महत्‍वाचे असते. हत्‍तीरोगाची तीव्र लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ल्याने योग्‍य उपचार घेणे आवश्‍यक असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here