prabodhini news logo
Home ठळक बातम्या गोविंद महाराजांच्या जीवनावर आधारित “सोनगीर योगी” या लघुपटात मनोहर खैरनार यांनी साकारली...

गोविंद महाराजांच्या जीवनावर आधारित “सोनगीर योगी” या लघुपटात मनोहर खैरनार यांनी साकारली खलनायकाची भुमिका

0
87

शिरपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – तहाडी सोनगीर येथील योग पुरुष गोविंद महाराज यांच्या जीवनावर आधारित “सोनगीर योगी” ह्या लघुपट युट्युबवर प्रसारित करण्यात आला आहे.
योग पुरुष गोविंद महाराज यांच्या जीवनावर आधारित सदर चित्रपटात, त्यांचे सोनगीर येथील वास्तव व भाविकांची भक्ती, आपुलकी या चित्रपटात दर्शवली असून गोविंद महाराजांप्रती गावकऱ्यांचे वाढत चाललेले प्रेम व भक्तीला गावातील पोलीस पाटील हे तीव्र विरोध करण्याची भूमिकेत दिसून येतात. सदर पोलीस पाटीलची भूमिका ही खानदेशातील शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील कलावंत मनोहर खैरनार यांनी उत्कृष्टपने साकारली आहे.
“सोनगीर योगी”या चित्रपटात गोविंद महाराज यांची मुख्य भूमिका भानुदास भोईर यांनी तर मनोहर खैरनार, सूरज परब, परीस लोखंडे, संजय चवरे, सचिन पाटील, श्याम पवार, रोहन सकट, संदीप रघुनाथ पाटील, किरण कोळी, निरंजन खाडे, कल्पेश डुकरे, राहुल, विनायक बागवे, सिद्धार्थ माने, भूषण पांडे, नितीन पाटील, संतोष भोपी, मंगेश देसले, विजय पाटील, संदेश क्षीरसागर, अभिजित पवार, अक्षय सोनावले, अल्पेश राऊत, बाळू धळपे, संतोष शिंदे, संकेत पाटील, रिची पाटील, स्वप्नाली केळजी, सुप्रिया आचरेकर, शुभांगी पाटील, समीरा मुंडे अधिक कलावंतांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here