कोरोची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क-ताराराणी पक्ष व महिला आघाडीच्या वतीने दत्त मंगल कार्यालय, कोरोची येथे आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ मोश्मी आवाडे वहिनी यांच्या हस्ते माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.
आपल्या घराला घरपण देताना हा प्रपंचीक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून निवेदक विवेक व वीणा यांच्या सोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक फ्रिज स्नेहल साळुंखे, द्वितीय क्रमांक ३२” टीव्ही सौ. मनीषा दहात्रे, तसेच पैठणीचे विजेते स्वप्नाली पाटील, सावित्री कोरे, आरती पाटील, ज्योती इंगळे, सुवर्णा पाणारे या महिलांना पैठणी असे विजेत्यांनी अनुक्रमे हि बक्षीसे पटकावली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना लकी ड्रॉ व स्पॉट गेम ५० प्रेशर कुकर मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते सर्व महिला भगिनींना देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ताराराणी महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड, माजी सरपंच शैलजा पाटील, ताराराणी महिला आघाडी कार्याध्यक्षा नजमा शेख, उपसरपंच पूजा टिळे, ग्रा.पं. सदस्या कोमल कांबळे, ग्रा.पं. सदस्या स्नेहल कोरोचीकर, ग्रा.पं. सदस्या हलीमा सनदी, ग्रा.पं. सदस्या अश्विनी चव्हाण, रुपाली सुतार, सविता दावणे, मेघा दावणे, मनीषा पाटील, सीमा पाटील, अश्विनी दौंड, दिपाली निकम, स्मिता पाटील, संगीता कांबळे, संगीता चौगुले, सपना भिसे, नंदा साळुंखे, अलका शेलार, अंजुम मुल्ला, अर्चना कुडचे, सीमा कमते, मंगल सुर्वे, शोभा कापसे, मेघा भाटले, गिरीजा हेरवाडे, सुनिता आडके, वर्षा तेली, सविता मोळके, सोनाली पाटील, रूपा सुतार, छाया भोसले, वर्षा पाटील, पाटील मावशी, सरोजनी पाटील, नीला तेली, राधिनी दिंडे, रोहिणी गोरकर, सुनिता मोहिते, निता खांडेकर, अनिता सुतार, संजीवनी कोकणे, ग्रा.पं.सदस्य शीतल पाटील, ग्रा.पं. सदस्य संजय शहापूरे, ग्रा.पं.सदस्य विकी माने, विनायक बचाटे, बंडा पाटील, अमोल जाधव, बाळासाहेब माने, दिपक तेली, निलेश पाटील, वैभव धायगुडे, दत्ता देसाई, कृष्णात बाणदार, अमोल होगाडे, राजू सुतार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

