प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील हाल मध्ये महिला व युवतीच्या हक्का साठी शहर महिला कार्याध्यक्ष हिमांगीनी बिस्वास ह्यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.
मेळाव्या च्या अध्यक्ष स्थानी शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड तर प्रमुख उपस्थिति म्हणून राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, युवक विधानसभा अध्यक्ष आकाश नीरटवार,ग्रामपंचायत सदस्य अनुकूल खन्नाडे उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविक भाषणात हिमांगी बिस्वास ह्यांनी कार्यक्रमाची रूप रेषा तसेच पक्ष मजबुती करिता येणाऱ्या अडचणी मांडल्या, त्या नंतर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महिला व युवतीच्या उपयोगी असणाऱ्या राज्य शासनाच्या योजनाची सविस्तर माहिती दिली, व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असणाऱ्या महिला व युवतीच्या न्याय हक्का साठी सदैव भाऊ म्हणून पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड आपले मनोगत मांडतांना राज्य शासना तर्फे लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती दिली व ज्यांचे अर्ज मंजूर झाले नाही त्यांचे अर्जा मधील त्रुटी दुरस्त करून त्यांचे पण अर्ज समाविष्ठ करून देण्या चे आश्वासन दिले तसेच शासनाच्या योजना चंद्रपूर शहरातील प्रत्येक महिला व युवती पर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रवेश करणाऱ्या महिला व युवती ना पक्षात योग्य ते स्थान देऊन त्यांच्या प्रत्येक अडचणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी पाठीशी खंबीर पणे उभा राहील असे आश्वासन देण्यात आले.
त्या नंतर कार्यक्रमाचे आयोजक शहर महिला कार्याध्यक्ष हिमांगी बिस्वास ह्यांनी कार्यमाला उपस्थित झालेल्या मान्यवारांचे तथा प्रवेश करणाऱ्या महिला व युवतीचे आभार मानले.

