
उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादीकी प्रबोधनी न्यूज 9921400542- अमरावती : 27 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, मुंबई-32 जिल्हा – शाखा, अमरावती यांची अमरावती पंचायत समिती सभागृह, कॅम्प रोड अमरावती येथे सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची जिल्हा सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सचिव किशोर मालोकार हे होते.
या बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन ठराव पास करण्यात आले. तसेच अफसर खान शेर खान यांची केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झाल्याने त्यांचा सत्कार घेण्यात आला. प्रत्येक तालुकास्तरावर दिव्यांग कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला.महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना मुंबई बत्तीस जिल्हाच्या अमरावती सहविचार सभा संपन्न
सभेत खालील प्रमाणे वेगवेगळ्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष ची नेमणूक करण्यात आलेली आहे.
अफसर खान शेर खान उर्दू प्रतिनिधी जिल्हा कार्यकारणी,चांदूरबाजार तालुकाध्यक्षअब्दुल खलील अब्दुल सलाम,मोर्शी तालुकाध्यक्ष
वाय आर गिरपुंजे,चांदुर रेल्वे तालुकाध्यक्ष आर एम मलमकर ,तिवसा तालुकाध्यक्ष सचिन इंगोले ,नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष विजय खांनझोडे,धारणी तालुकाध्यक्ष हिरालाल रावत,अचलपुर तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण ,अंजनगाव सुर्जी तालुकाध्यक्ष हिम्मत मते, भातकुली तालुकाध्यक्ष भारत जामनेकर, चिखलदरा तालुकाध्यक्ष इंदिरा रेवस्कर. पहिल्यांदाच संघटनेच्या प्रत्येक सदस्याला संघटने कडून ओळखपत्र देण्यात आले.
अपंग कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करून योग्य दिशा ठरवण्यात आली. जिल्हाध्यक्ष व जिल्हासचिव यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेऊन आगामी कार्यक्रमाची रूपरेषा सदस्यांसमोर मांडली.
यावेळी महा. राज्य अपंग कर्म संघटना अमरावतीच्या जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत मामनकर, कोषाध्यक्ष युवराज थोरात, जिल्हा उपाध्यक्ष शालिनी बोरखडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजु डांगे, जिल्हा सहसचिव भारत जामनेकर,जिल्हा सहकोषाध्यक्ष सचिन इंगोले, जिल्हा सदस्य विजय खांनजोडे,संघटक मिलिंद ढेंगे, संतोष चव्हाण, कैलास माकोडे, नाजीम अली किफायत अली, अब्दुल खलील, हिम्मत मते, विशाल धोटे, मुक्ता बोंडे, मृणालिनी मेटे, अझर सर, हिरालाल रावत, गीरपुंजे, मलमकर, इंदिरा रेवस्कर व अमरावती जिल्ह्यातील बहुसंख्य तालुका कार्यकारिणी संघटनेचे दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंगेश खंडारे यांनी केले.














