अश्विनी कोटमे महिला जिल्हा प्रतिनिधी, नाशिक – प्रजासत्ताक अमृत महोत्सव समिती महाराष्ट्र राज्य समिती तर्फे समाजातील आरोग्य, कला, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत करण्याचा नेत्रदीपक कार्यक्रम दिनांक २५ सप्टेंबर रोजी बांद्रे येथील ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी तोडसकर नासा मधील भारतीय शास्त्रज्ञ रेडीक एंजल्स, पद्मश्री प्राप्त संशोधक जी.डी. यादव, ज्येष्ठ साहित्यिक, कवी, बाळासाहेब तोरस्कर, डॉ.खं. र. माळवे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन,कला, विकास समिती, वल्ड व्हिजन संस्थेचे नागेश हुळहुळे, प्रहार वृत्तपत्राचे संपादक डॉ. सकृत खांडेकर, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील दिग्गज या वेळी उपस्थित होते.
या वेळी साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि भावी योजना लक्षात घेऊन अविनाश गडवे (अवती) नाशिक यांचा साहित्य रत्न प्रजासत्ताक अमृत महोत्सव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या पुर्वी देखील लेखना सोबतच वक्तृत्व, वादविवाद, स्पर्धेसाठी त्यांना अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत.

