लक्ष्मण कांबळे लातूर प्रतिनिधी:- भिम आर्मी संस्थापक अध्यक्ष, खासदार चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग यांच्या आदेशाने महाराष्ट्र मध्ये विभागानुसार समीक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते काल दि 26 ऑगस्ट2024 रोजी लातूर येथे मराठवाडा समीक्षा बैठक संपन्न झाली,सर्व प्रथम डॉ बाबासहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्हार घालून या बैठकीचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटक म्हणून राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांनी केले या बैठकीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनोद कोल्हे मराठवाडा अध्यक्ष हे होते तर प्रमुख पाहुणे रमेशजी भावेश माजी वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र सुनीलजी गायकवाड माजी कार्याध्यक्ष महाराष्ट्र), दीपकजी भालेराव माजी मुख्य संघटक महाराष्ट्र, अक्षयजी धावारे माजी संघटक महाराष्ट्र ॲड.सुभाषजी सरवदे मराठवाडा कार्याध्यक्ष हे होते.
येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून भीम आर्मी हे गावागावात पोहोचली पाहिजे, आपले जास्तीत जास्त आमदार विधानसभेवर जातील अशी व्यवस्था आपण तयार केली पाहिजे असे मत राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांनी व्यक्त केले.
आपल्या मतावर निवडून गेलेले आमदार खासदार जर आपले काम करत नसतील लोकांचे प्रश्न सोडवत नसतील तर त्यांना जाब विचारायची धमक हे भीम आर्मी मध्ये आहे दीपक भालेराव यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला देशाची शासन करते जमात बनायचं आहे या दोन्ही महापुरुषांनी दिलेल्या संदेशावर आपण विचार न करता आपण शासनाने दिलेल्या दीड आणि दोन GB च्या नादामध्ये पब्जी आणि रमी मध्येच व्यस्त आहेत असे मत विनोद कोल्हे मराठवाडा अध्यक्ष यांनी व्यक्त केले.
आता रोडवर उतरून संघर्ष करण्याची वेळ आहे असे मत अक्षयजी धावारे माजी महाराष्ट्र संघटक यांनी मत व्यक्त केले.
तर प्रमुख उस्थितीमध्ये सुभाषजी दांडेकर जिल्हाध्यक्ष जालना महेंद्रजी गायकवाड जिल्हाध्यक्ष हिंगोली, अविनाशजी गायकवाड जिल्हाध्यक्ष धाराशिव, स्वप्निल जी भोसीकर जिल्हाध्यक्ष नांदेड, बाबाजी मांदळे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष बीड महानंदाताई कलसे जिल्हामहासचिव पुणे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास अण्णा चक्रे जिल्हाध्यक्ष लातूर विशाल पोटभरे जिल्हा उपाध्यक्ष लातूर बबलू शिंदे जिल्हा सचिव लातूर, प्रशांत घनगावकर जिल्हा संघटक, बप्पा घनगावकर लातूर तालुका अध्यक्ष , अतुल सोनकांबळे निलंगा तालुका अध्यक्ष, आकाश कस्तुरे उदगीर तालुका अध्यक्ष, सिद्धार्थ कांबळे औसा तालुका अध्यक्ष अजय कांबळे रेणापूर तालुकाध्यक्ष राहुल जी कांबळे उदगीर शहराध्यक्ष समाधान झोडपे, आकाशजी ढगे, हरीश सोनवणे, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले
तदनंतर परभणीच्या जिल्हा प्रमुख पदी चंद्रशेखर बनसोडे याची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

