
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर आज दिनांक: 28/8/24 आम आदमी पक्ष चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष वाहतूक संघटन श्री संगम सागोरे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना भेटून एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. त्यांनी दाताळा रोड वरील हनुमान मंदिरा जवळील चौकाचे नामकरण “छत्रपती शिवाजी महाराज चौक” असे करण्याची विनंती केली आहे.
श्री सागोरे यांनी या मागणीचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे थोर वीरपुरुष आणि आदर्श राज्यकर्ते होते. त्यांच्या नावाने या चौकाचे नामकरण केल्यास तो आमच्या शहराच्या ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण भाग बनेल.”
या मागणीसाठी श्री सागोरे यांनी मा. आयुक्तांना एक औपचारिक निवेदन सादर केले आहे. त्यांनी आयुक्तांना या विनंतीचा सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
या भेटीदरम्यान खालील जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार,ज्येष्ठ नेते सुनील मुसळे,जिल्हा सचिव राजकुमार नगराळे,प्रशांत सिदुरकर,युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे,महानगर अध्यक्ष योगेश गोखरें,महानगर महिला अध्यक्ष ऍड तबसुंम शेख,कुणाल शेटे,जिल्हा संगठन मंत्री योगेश मुरेकर,वाहतूक जिल्हाध्यक्ष संगम सागोरे,महानगर संगठन मंत्री संतोष बोपचे,अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद सय्यद,महानगर मीडिया प्रमुख प्रशांत रामटेके,जिल्हा महासचिव संतोष दोरखंदे,युवा सचिव आदित्य नंदनवांर,महानगर उपाध्यक्ष सुनिल सदभ्यया,सिकंदर सागोरे,विकास मंडल,शुभम साखरकर,जितेंद्र कुमार भाटिया,कार्तिक सीडाम,चेतन आगळे,माधव मामीडवार,अशीष सिंग,ईश्वर सहारे इत्यादि उपस्थित होते..
आम आदमी पक्ष चंद्रपूर शाखा या मागणीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीची वाट पाहत आहे आणि आवश्यक असल्यास या विषयावर पुढील पाठपुरावा करेल.














