विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – सावली तालुक्यातील खेडी येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाला सांस्कृतिक सह इतर कार्यक्रमास सोयीचे व्हावे या उदांत हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी तसेच माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी शासन दरबारी सदर मागणी लावून धरल्याने अखेर सावली तालुक्यातील खेडी येथे एक कोटी रुपयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती सांस्कृतिक सभागृह मंजूर झाले.
प्रत्येक समाजाला न्याय व विकासाचे मुख्य प्रवाहात आणण्याकरिता सदैव अग्रेसर असणारे राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार हे आपल्या विकासात्मक दूरदृष्टीकोणामुळे सर्व दूर परिचित आहेत. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून समाजातील प्रत्येक प्रवर्गासाठी त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक वारसा जपण्याकरिता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे नेहमीच धडपड करीत असतात. अशातच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यातील खेडी येथे धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागंतर्गत राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार व धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांनी पाठपुरावा करून खेडी येथे एक कोटी किंमतीचे सांस्कृतिक सभागृह मंजूर केले आहे. यामुळे धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार, माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, सोमेश्वर कंचावार, राजू कंचावार, नागेश ओगुवार, परशुराम मर्लावार, मारोती कंकलवार, पुरुषोत्तम नेरडवार, दिलीप कंचावार, संजय मर्लावार यांनी आभार मानले आहे.

