सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर- आज दिनांक 29/7 ला क्लबचे सदस्यांनी प्यार फाउंडेशनला औषध आणि धान्याची मदत करण्यात आले.
मनीषा लांबट, अमित ठाकरे यांच्या कडून २५,०००/- च्या औषधी उत्पादने, ज्यामध्ये विविध औषधे आणि उपचारांसाठी आवश्यक वस्तूंचा उपलब्ध करून दिले आहे. स्मिता खांडरे यांच्या कडून तांदूळ जे पोषण मिळवण्यासाठी आणि जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहे. कविता झाडे यांच्या कडून ५ किलो गूळ, ज्याचा वापर खाद्यपदार्थांमध्ये आणि औषधी उपयोगात होऊ शकतो. गौरी मारेकरी कडून गहू आणि बिस्किटांचे पॅकेट्स दीर्घकाळ टिकणारे आणि पोषणयुक्त आहाराचे घटक आहेत.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील सर्व जीव एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकमेकांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. क्लबच्या अध्यक्ष सुचिता जेऊरकर, सचिव पल्लवी तेलंग, सदस्य मनीषा लांबट, कविता झाडे, आणि अंजली उत्तरवार यांच्या उपस्थितीने या कार्याची गरिमा वाढवली आहे.

