राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय वन अधिकारी यांना निवेदन.
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील खैरगाव चांदसुर्ला येथील वनसमिती स्थापन झाल्यापासून आजपर्यंत वनविभागाद्वारे या समितीला निधी देण्यात आला नसल्याने विभागीय वन अधिकारी श्री प्रशांत खाडे साहेब यांची भेट घेत निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती खैरगाव ग्रामपंचायतचे सदस्य अंकित ढेंगारे यांनी केली.
संयुक्त वन व्यवस्थापन ही एक भागीदारी आहे ज्यामध्ये नैसर्गिक जंगलांच्या व्यवस्थापनामध्ये स्थानिक समुदाय आणि वन एजन्सी यांचा समावेश होतो. १९८८ चे राष्ट्रीय वन धोरण हे असे वाहन होते. ज्याद्वारे ही संकल्पना भारत सरकारने प्रथम मांडली होती. वन विभाग आणि वन संरक्षण समिती म्हणून ओळखली जाणारी ग्राम समिती सामान्यत: जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट करारामध्ये गुंतलेली असते, तथापि, कराराच्या तरतुदी राज्यानुसार बदलतात आणि वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी संबोधले जातात. लाकूड नसलेली वन उत्पादने आणि लाकूड उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक भाग या बदल्यात चराई, आग आणि बेकायदेशीर कापणीपासून वनसंपत्तीचे संरक्षण करण्यास ग्रामस्थ सहमत असतात.
जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये जंगलाशेजारी राहणाऱ्या स्थानिक समुदायांना देशाच्या वनसंपत्तीवर सहभागी प्रशासनाच्या संस्थात्मकीकरणामध्ये सामील केले जाते. वन संरक्षण समित्यांच्या मदतीने खराब झालेल्या वनजमिनींचे पुनर्वसन करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सह-व्यवस्थापन उपक्रम जंगलाच्या संरक्षण आणि पुनरुत्पादनासाठी सामायिक आदर आणि कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांवर आधारित वन किनारी समुदाय आणि वन विभाग यांच्यात भागीदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
संयुक्त वन समिती ची स्थापना राष्ट्रीय वन धोरणानुसार करण्यात आली, ज्यात स्थानिक लोकांचा समावेश करण्याच्या मूल्यावर जोर देण्यात आला. त्यानंतर शासनाने अशा संस्था स्थापन करून त्यांना अधिक बळकट करण्यासाठी योग्य तो ठराव व निर्देश जारी केले. सोबतच आर्थिक सहाय्य करण्याची व्यवस्था देखील उभारली आहे.
वन विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या अर्थ सहाय्यामार्फत संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व वन विभागातील कार्यरत कर्मचारी हे सचिव म्हणून कार्यक्ष्रेत्रातील गरजू व पात्र लाभार्थ्यांना विविध सोई सुविधा उपलब्ध करून देत परिसराचा विकास करण्याचे कार्य करते. चांदसुर्ला खैरगाव या समिती सोबत गटीत करण्यात आलेल्या ताडाळी, पडोली, मोरवा, छोटा नागपूर, विचोडा, आंभोरा या सहा संयुक्त वन व्यवस्थापण समितीला वन विभागातर्फे निधी देण्यात आला मात्र एकमेव चांदसुर्ला खैरगाव या समितीला अजूनही निधी देण्यात आला नाही.
करिता सदर व्यवस्थापन समितीला तात्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा या मागणीचे निवेदन वन विभागाचे विभागीय वन अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेत दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय विभाग जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन फूलझेले, उर्जानगर ग्रामपंचायत सदस्य अनुकुल खन्नाडे, खैरगाव ग्रामपंचायत सदस्य अंकित ढेंगारे, आशिष ठक्कर उपस्थित होते.

