देसाईगंज प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दि.30/08/2024 ला देसाईगंज मधील रेल्वे च्या बोगद्या लगत PWD च्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे. या खड्ड्याकडे प्रतिनिधी तसेच प्रशासन मुद्दामहून दुर्लक्ष करीत आहेत या खड्ड्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण?
ही बाब राष्ट्वादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गटा)च्या पदाधिकाऱ्यांना लक्षात आली तेव्हा त्यांनी शासनाचा विरोध दर्शवीत PWD च्या मुख्य रस्त्यावर बेशरमाचे झाड लावून शासनाच्या दुरबुद्धीला राडा घातले.
या प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस (शरदचंद्र पवार गटाचे ) क्षितिज उके तालुकाध्यक्ष,रोशन शेन्डे तालुका उपाध्यक्ष,अशोकजी माडावार शहर अध्यक्ष, हितेंद्रजी गजघाटे रा.का. कार्यकर्ते,अविनाश राघोर्ते रा.का.कार्यकर्ते,ताजूल उके ,नरेश वासनिक ,समीर सपाटे सामाजिक कार्यकर्ते व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

