
जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – मविप्र समाज संस्था संचलित जनता विदयालय व अभिनव बालविकास मंदीर वरखेडा विद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस. सोनवणे यांनी केले. याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ,वरखेडा गावचे पोलीस पाटील कैलास बलसाने,ग्रामपालीका सदस्या आशाताई भुसाळ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एकनाथ उफाडे, महिला पालक कोमल सोनवणे, एन.ई बुवा आदी विदयालयात उपस्थित होते.
विदयालयाचे मुख्याध्यापक सुनिल पाटील यांनी मुलींची सुरक्षा करणे हे आमचे कर्तव्य आहे.त्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्नवादी आहोत. असे आपल्या मनोगतातून सांगितले.
सखी सावित्री समिती खालीलप्रमाणे एकनाथ दौलत उफाडे-अध्यक्ष नीता सुंदरनाथ सोनवणे-सदस्य शुभांगी हिवाळे-सदस्य, कैलास नामदेव बलसाने-सदस्य प्रीती शामलाल अग्रवाल-सदस्य सारिका खंडेराव लिलके-सदस्य सौ कोमल बापूराव सोनवणे-सदस्य आशा मधुकर भुसाळ सदस्य,कुमारी सृष्टी देविदास भावले-विद्यार्थीनी सदस्य, कुमारी मारिया खालील खाटीक-विद्यार्थी सदस्य, कुमार कापसे साहिल रामदास,कुमार गांगुर्डे समीर रावसाहेब-विद्यार्थी सदस्य, पाटील सुनील मनसुख -सचिव अशा प्रकारे समिती स्थापन करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश नाना भुसाळ यांनी शाळेतील विद्यार्थीनींची सुरक्षा महत्वाची आहे.त्या दृष्टीने पावले उचलणे क्रमप्राप्त आहे.सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक विठ्ठल ढिकले यांनी तर आभार संजीव पठाडे यांनी मानले.














