prabodhini news logo
Home ठळक बातम्या वरखेडा विद्यालयात शाडू माती पासून गणपती मूर्ती बनवणे कार्यशाळा संपन्न

वरखेडा विद्यालयात शाडू माती पासून गणपती मूर्ती बनवणे कार्यशाळा संपन्न

0
134

जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर विद्यालय मध्ये आज दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी पर्यावरण पूरक शाडू माती पासून गणपती मूर्ती बनवणे ही कार्यशाळा आज मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांच्या सहभागात संपन्न झाली.
शाडू माती पासून गणपती बनवणे हे कार्यशाळा हरित सेना अंतर्गत घेण्यात आली या कामी हरित सेनेचे प्रमुख विद्यालयाचे उपशिक्षक श्री संजीव पठाडे सर,एन ई.बुवा, सुवर्णां भोर,वृषाली रौदळ व हरित सेना यांच्या माध्यमातून शाडू माती विद्यालयांमध्ये उपलब्ध करून देवून विद्यार्थ्यांच्या हातून आज गणपती मूर्ती बनवणे कार्यशाळा घेण्यात आली.
पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवणे यासाठी विद्यालयातील ५ वी ते ७ वी चा लहान गट व ८ वी ते १० वीचा मोठा गट या सर्वांनी स्वतः सहभाग घेऊन आपापल्या परीने गणेश मूर्ती तयार केल्या या उपक्रमास मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याद्वारे श्री.शांताराम घोलप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडगाव व गणेश जाधव खेडगाव विद्यालय यांनी या दरम्यान भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सुनील पाटील सर,जेष्ठ शिक्षक रामदास महाले,सोमनाथ शिंदे,रविंद्र ठेपणे, अभिनव बाल विकासचे मुख्याध्यापक करण भोई,कैलास उगले भाऊसाहेब,क्रीडा शिक्षक सुभाष मालसाने,हरीत सेनेचे प्रमुख संजीव पठाडे उपशिक्षक नरेंद्र वड, दुष्यंत जाधव,शाम बोराडे यांनी सहभाग दर्शवला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here