तरी सुद्धा सर्व बांधवांनी हा वचन नामा नेत्यांकडुन अवश्य लिहुन घ्यावा.
रोशन शेख चंद्रपूर प्रतिनिधी- चंद्रपुर शहरात आता बदल हवा.चंद्रपुर शहरात जमिनीशि जुळलेला नेता पाहिजे.असा नेता पाहिजे जो स्वताह गरिब असुन गोर गरीब गरजु जनसामान्य लोकांचे तळमळिने काम करु शकेल जनतेचे प्रश्नं सोडवु शकेल असा नेता चंद्रपुर शहरातल्या नागरिकांना मिळायला पाहिजे.विना कारण शासकिय तिजोरितला पैसा म्हणजेच जनतेचाच पैसा विनाकरण नं ऊडवता जनतेचाच पैसा जनतेच्याच कामासाठी जनतेच्या विकासासाठी लाऊ शकेल असा नेता चंद्रपुर शहरात पाहिजे.चंद्रपुर शहरात असा नेता पाहिजे जो जनतेच्या पैशाने स्वताहचे बंगले.महल.घर.नं बनवता गोर गरिब गरजु लोकांना घर बांधुन देऊ शकेल असा नेता चंद्रपुर शहरात पाहिजे.आज सर्वत्र बेरोजगारी खुप वाढली असुन बेरोजगारांना रोजगार देऊ शकेल असा नेता चंद्रपुर शहरातल्या लोकांना मिळाला पाहिजे.या वाढत्या महागाईच्या काळात मोठ मोठे लोकं श्रिमंत लोकं जगु शकते पन जनसामान्य गोर गरीब लोकांनी या ऐवढ्या महागाईच्या काळात कशे जगायचे.त्याकरिता वाढती महागाई कमि करन्यासाठी.वाढती महागाई रोखण्यासाठी व वाढती महागाईच्या विरोधात शासन प्रशासनाला झोपी गेलेल्या सरकार ला वाढत्या महागाई वरती वारंवार प्रश्नं विचारणारा नेता चंद्रपुर शहराला मिळायला पाहिजे.बेरोजगारी खुप वाढली असुन आमचे भाऊ बंधु आई बहिनी पोट भरन्यासाठी कुटुंबाला जगविन्यासाठी चंद्रपुर शहरातल्या फुट पाथ वरती बसुन फळ फ्रुट.भाजिपाला विकुन आपले पोट भरत आसतात.पन फुट पाथ वरती पोट भरणा-या त्या लोकांना चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिका तर्फे हटविले जात असुन त्या गोर गरिब लोकांवरती कारवाई केली जाते.व त्या गोर गरिब लोकांचे हात ठेले व सामान महानगर पालिका तर्फे जप्तं केल्या जाते.चंद्रपुर शहरातल्या फुट पाथ वरती पोट भरणा-या लोकांचे ठेले कधिच हटले नाही पाहिजे व फुट पाथ वरती पोट भरणा-या लोकांना महानगर पालिकेचा त्रास नाही झाला पाहिजे त्या करिता चंद्रपुर शहरातल्या लोकांना असा छान नेता मिळणे सुद्धा गरजेचे आहे.
माणुसकिची तळमळ गोर गरीब गरजु लोकांच्या हिताचे काम गोर गरीब लोकांसाठी आपुलकी ठेवणारा नेता चंद्रपुर शहराला मिळाला पाहिजे.
जो जनतेच्या विश्वासावरती खरा ऊतरु शकेल असा नेता चंद्रपुर शहराला मिळाला पाहिजे.
आज काल सर्वत्र एकच दृष्य बघायला मिळत आहे.गरिब का बेटा हमारा नेता.अशे म्हणत कित्येक नेत्यांनी जनतेच्या पैशावरती मोठ मोठे बंगले.घर बांधुन टाकले.मोठ मोठ्या महागड्या गाड्या घेऊन टाकल्या.मोठ मोठ्या शेत्या घेऊन टाकले.ऐवढी संपत्ती कमवुन टाकली की नेत्यांची १० पिढ्या सुद्धा खाईल तरी त्या नेत्यांची संपत्ती संपु शकत नाही.पन लोकशाहीचे हक्कं बजावत या सर्व राजकारणाच्या मधात पिसला दाबला गेला लोकशाहीचा मतदाता.ज्या मतदात्यांनी लोकशाहीचा हक्कं बजावत नेत्यांना लोकशाहीत मतदान केले ते सर्व नेते श्रीमंत करोडपती झाले.व लोकशाही चा मतदार व या देशाचा राजा.चालक. मालक.भ्रष्टाचार.महागाई.बेरोजगारी.च्या जाळ्यात अडकुन गरिब झाला.हे आपल्या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल की आपल्या एका बोटाच्या आपल्या मतदानाच्या.भरोशावरती सेवक नेते श्रीमंत होऊन जातात आणि लोकशाही चा मतदार राजा महागाई.भ्रष्टाचार.बेरोजगारी.या सर्वात गुंताळला जातो.आणि लोकशाहीचाच मतदाता लोकशाही चे हक्कं बजावत बेरोजगारी.भ्रष्टाचार.महागाईच्या या विळख्यात पिसला जातो.हे सुद्धा आपल्या लोकशाहीच्या मतदात्यांचे दुर्देवचं म्हणावे लागेल.
तुमचे एक बोट.तुमची दृष्टी.तुमचे.मण.तुमचे मत.या देशाचे उज्वल भविष्य घडवु शकते.म्हणुन मतदान करतांना अवश्य विचार करा.की कुणाला मतदान करायचे.तुम्हि लोकशाहीत नेत्यांना फक्तं मतदानच नाही करत. तर तुम्ही आपले मोलाचे ५ वर्षे व आपल्या भारताचे भविष्य त्या मतदान पेटीत बंद करता जे मतदान मोजणि झाल्यानंतर तुमचे वं या देशाचे उज्वल भविष्य घडवु शकते.म्हणुन मतदान करतांना विचार करा तुमच्या मुलांचे.तुमच्या कुटुंबाचे.या भारताचे भविष्य तुमच्या हाती राहणार आहे.
राजकारणि नेते मंत्री जेव्हा तुमच्या दरवाज्यात तुम्हाला मत मागायला येतिल तेव्हा तुम्हि त्या सर्व नेत्यांना लोकशाहीचे हक्कं बजावत लोकतंत्राच्या माध्यमातुन तुमचे प्रश्नं अवश्य विचारा.
विचारा नेत्यांना
१)तुम्ही निवडुन आल्यानंतर वाढती महागाई कमी करन्यासाठी काय कराल.
२)तुम्ही निवडुन आल्यानंतर माझ्या मुलांना नोकरी लाऊन द्यायसाठी काय कराल.
३)तुम्ही निवडुन आल्या नंतर ५ वर्षे खरच तुम्ही जनतेची सेवा कराल काय.
४)मी जर बिमार झालो तर माझ्या कुटुंबासाठी काय कराल.
५)तुम्ही निवडुन आल्यानंतर पुढच्या ५ वर्षांपर्यंत आमच्या कुटुंबासाठी काय कराल.
६)तुम्ही निवडुन आल्यानंतर माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी काय कराल.
७)तुम्ही निवडुन आल्यानंतर ५ वर्षांपर्यंत माझ्या देशाला समोर वाढवासाठी तुम्ही काय कराल.
८)तुम्ही निवडुन आल्यानंतर माझ्या बळिराजाच्या भाजि पाल्याला वं धांन्याला योग्य भाव मिळेल काय.
९)फुट पाथ वरती पोट भरणा-या लोकांना हटविले जाते.तुम्ही निवडुन आल्यानंतर फुट पाथ वरती पोट भरणा-या लोकांना न्याय मिळेल काय.
१०)तुम्ही निवडुन आल्यानंतर शेतक-यांवरती होणारे अन्याय थांबेल काय.
११)तुम्ही निवडुन आल्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये छान स्वास्थ्य सेवा वं औषधी मोफत मिळेल काय.
१२)तुम्ही निवडुन आल्यानंतर लाईट बिल.गॅस सिलेंडर.डिझेल पेट्रोल चे वाढते भाव कमी होणार काय.
१३)गेली २० ते २५ वर्षापासुन आम्हा झोपड पट्टी वासियांना घर पट्टे अजुनही मिळाले नाही.तुम्ही निवडुन आल्यानंतर आम्हा झोपड पट्टी वासियांना घर पट्टे मिळणार कायं.
१४)आमच्या जाति गणने नुसार आम्हाला आरक्षणात मान आणि स्थान अजुनही मिळाला नाही.तुम्ही निवडुन आल्यानंतर आम्हाला आरक्षणात मान आणि स्थान मिळेल कायं.
१५) नेत्यांच ठिक आहे ते ऐसी च्या घरात बसतात.ऐसी च्या गाड्यांमध्ये फिरतात.पण जनतेच काय जनतेला धुळ.वायु.प्रदुषणाचा नाहक त्रास सहन करावा लागतो.आणि याच मुळे शहरातल्या लहान मुलांना.श्वास.दमा.एलर्जी.फुपुसांचे आजार.डोळ्यांचे आजार अशे कितेक आजार होऊन.जातात.तर नागरिकांना वायु प्रदुषण.धुळ प्रदुषणा पासुन वाचविण्यासाठी वं धुळ प्रदुषण आणि वायु प्रदुषण कमी करन्यासाठी तुम्ही काय कराल.
१६) तुम्ही दिलेली गॅरंटी तुम्ही दिलेले आश्वासन खरच पुर्ण करणार काय.
हा खुप महत्वाचा विषय आहे.
कारण हा देश तुमचा आहे.ही लोकशाही तुमची आहे.हा लोकतंत्र तुमचा आहे.भारतिय संविधान व संविधान मध्ये दिले गेलेले अधिकार तुमचे आहे.
भाजीपाला.धान्यं.वस्तु खरेदी करतांना खुप प्रश्नं विचारता.
मग जनतेशी तुमच्याशी जुळलेले प्रश्नं नेत्यांना का बरं विचारत नाही. नेत्यांना तुमचे प्रश्नं अवश्य विचारा.
मी या भारत देशाचा चालक मालक असुन मी लोकशाहीचा मतदाता आहे.मी मतदाता आहे आणि मी नेत्यांना प्रश्नं विचारणारच.
लोकशाही माझी लोकतंत्र माझा.मी तर आहे लोकशाही या लोकतंत्राचा राजा.
चिकन.मटन.जेवन.बिर्याणि.दारु.वं १००० हजार ५०० रुपयाला विकुन जाऊ नका तुमचे मत खुप अमुल्य आहे.तुमचे अमुल्य मत १००० हजार ५०० रुपयाला विकु नका.आपली किंमत कवडी मोल भावात लाऊ नका.कारण स्वातंत्र्य वं लोकशाही ही अशिच मिळाली नाही.तर त्या लोकशाही वं स्वातंत्र्यासाठी भारत देशाच्या खुप महान क्रांतिका-यांंनी थोर महापुरुषांनी खुप संघर्ष केला आहे.त्यानंतरच भारत देशाला लोकशाही वं स्वातंत्र्य मिळाले.मतदान करतांना क्रांतिका-यांच्या बलिदानाला वं थोर महापुरुषांच्या योगदानाला विसरुन जाऊ नका.ऐवढेच सर्व बांधवांना सांगु ईच्छितो.
नक्कि विचार करा कारण लिहलेल्या लेख नुसार बदल हवा आहे.
खुप झाले मतदात्यांचे हाल.अबकी बार जनता पुछेगि सवाल.
जनेच्या प्रश्नांवरती खरा ऊतरु शकेल वं जनतेसाठी मांडलेल्या सर्व समस्येचे निवारण करु शकेल असा नेता अजुनपर्यंत जनतेला मिळाला नाही.
मण की बात लोकतंत्र के साथ.
लोकशाहीचे विचार छान वाटल्यास ही पोस्ट सर्वत्र शेअर वायरल करा.
जनतेप्रती माझे सुविचार.जनता आहे माझा परिवार.
माझा परिवार मा़झी जवाबदारी.लोकशाहीचे सुविचार पोहचले पाहिजे घरो घरी.

