परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज ग्रीन परभणी वृक्ष टीम च्या वतीने परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसर समोर मोकळे मैदान मराठवाडा हायस्कूल व मुंदडा पॉलिटेक्निक कॉलेज मैदान येथे भव्य दिव्य ग्रीन परभणी वृक्ष टीम च्या वतीने प्रत्येक शनिवारी वृक्ष लागवडीची मोहीम चालू आहे या मोहीम मध्ये आज दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात ते नऊ या वेळामध्ये मराठवाडा हायस्कूलच्या समोरचे सर्व मैदाना परिसरात खड्डे पाडून व पिंपळ उंबर करंजी कडुलिंब वड फळाचे फुलाचे अनेक प्रकारच्या जातीचे उपयोगी ऑक्सिजनचे झाड लावून वृक्षरोपण लागवड मोहीम राबविण्यात आली सर्वांनी प्रत्येकाने झाडे लावा झाडे जगवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे प्रत्यक्ष उत्सवात प्रत्येक ठिकाणी मोकळ्या मैदानात वृक्ष वृक्षरोपण व झाड लावण्याचा उपक्रम करा यामध्ये सर्व ग्रीन परभणी वृक्ष टिमचे सदस्य वृक्ष डॉक्टर वृक्ष मित्र वृक्षदुत वृक्ष शेतकरी वृक्ष शिक्षक वृक्ष मॅडम वृक्ष सर वृक्ष इंजिनिअर वृक्ष विद्यार्थी वृक्ष वारकरी वृक्ष चालक वृक्ष कर्मचारी वृक्ष पत्रकार वृक्ष छायाचित्रकार वृक्षहॉटेल वृक्ष खड्ड्याची मिशन वृक्ष ट्रॅक्टर खड्डे पाडण्याची मिशन सर्व क्षेत्रातील वृक्षप्रेमी पर्यावरण प्रेमी आपली परभणी आपलं शहर ग्रीन परभणी वृक्ष टीम तसेच प्रभावती नगरी मंच महिला मंडळ आणि मराठवाडा हायस्कूल येथील सर्व उप मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी व सैनिकी विद्यार्थी सर्व उपस्थित होते अशी माहिती ग्रीन परभणी वृक्ष टीम शहर परभणीच्या च्या वतीने पत्रकारांना माहिती देण्यात आली.

