
बहुजन समाज पक्षाची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी.
किशोर मडगूलवार जिल्हा संपादक चंद्रपूर-महाकाली कॉलर या परिसरातील लोकांना पाण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून इथल्या कोळसा खाणीमध्ये पाणी शिरल्यामुळे वार्डाला पाणीपुरवठा करणारी प्रमुख पाईपलाईन पाण्याखाली बुडाली. त्याच पाईपलाईनमुळे परिसरातील लोकांसाठी पाण्याचा पुरवठा होत होता. परंतु प्रमुख पाईपलाईन पाण्याखाली गेल्यामुळे परिसरातील लोकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत. आहे अमृत जल योजनेअंतर्गत इथल्या लोकांना नळाचे कनेक्शन देण्यात आले परंतु अद्यापही नळ सुरु करण्यात आले नाही. चंद्रपूर महानगरपालिके मार्फत पाण्याच्या टँकरद्वारे व्यवस्था होत असली तरी वार्डातील लोकसंख्या पाहता व गरज पाहता ती अपुरी आहे. तरी महाकाली कॉलरी परिसरातील लोकांची पाण्यासाठी होणारे हाल व त्यांच्या समस्येकडे लक्ष देत परिसरातील लोकांना पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी काही ठिकाणी पाण्याचे टंकी बसवून त्या टंकीमध्ये टँकरच्या माध्यमातून नियमित पाण्याची व्यवस्था करणे व इतर ठिकाणी दोन ट्युबवेल किंवा बोरवेल च्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करणे किंवा अमृत जल योजनेअंतर्गत दिलेल्या नळाचे कनेक्शन्स लवकरात लवकर सुरू करून महाकाली कॉलरी परिसरातील लोकांची पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून द्यावी या आशियाचे निवेदन काल दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त साहेब यांना बहुजन समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.. सकारात्मक चर्चेनंतर लवकरच महाकाली कॉलनी परिसरातील लोकांसाठी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असा सन्मानीय आयुक्त साहेबांनी शब्द दिला..














