
अकोला प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट २०२३ ते ३१ ऑगस्ट २०२४ प्रवास प्रबोधनाचा या कार्यक्रमा अंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात आमच्या सामाजिक कार्याबद्दल अन्यविरुद्ध व अनेक गोरगरिबांना न्याय मिळून देण्याचा काम करतो या कार्याची दखल घेऊन प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन आमचा सत्कार करण्यात आला.गेल्या दोन ते तीन वर्षापासून मी सम्राट अशोक सेनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी राष्ट्रपतीकडे मागणी केली.
छत्रपती,फुले,शाहू,आंबेडकर,व क्रांतीगुरु लहुजी वस्ताद अण्णाभाऊ साठे यांचे विचार मी समोर नेण्याचे कार्य करतो याची दखल परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घेऊन माझा हा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला आणि या ठिकाणी मला भाषण करण्याची सुद्धा संधी दिली त्या ठिकाणी मी माझ्या भाषणात मांडलेले विचार साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे ही मागणी सुद्धा या ठिकाणी मी केली आणि करत राहणार आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून परिवर्तन युवक संघटनेच्या अध्यक्ष डॉ रामकृष्ण डोंगरे यांच्या वतीने ही मागणी केल्या जात आहे आणि आम्ही सुद्धा हेच मागणी शेवटपर्यंत करणार जोपर्यंत हा पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत आमची हे मागणी चालूच राहणार.आज हा समारोपीय कार्यक्रम शासकीय विश्रामगृह अकोला येथे पार पडला.आमच्या सामाजिक कार्याची पावती आम्हाला या संघटनेच्या वतीने दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद करतो आणि तुमच्या कार्याला माझा शेवटपर्यंत पाठिंबा असणार हेच मी या ठिकाणी शब्द देतो.














