पूर्ण वर्षभरात उत्सुकता असणारा, सगळ्यांना हवा असणारा, एकच देव बाप्पा, ज्याची सगळेलेख – आतुरता गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतात तो म्हणजे गणपती बाप्पा.
‘गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया’ असा नारा करत आम्ही गणपतीचे आगमन करत असतो.
गणेश उत्सव म्हटले की सगळ्यात पहिले घराची रंगरंगोटी, साफसफाई, मग गणपती साठी मखर, आरास याची तयारी. बायकांची लगबग गोड पदार्थ बनवण्यासाठी नेवरी (करंज्या ) लाडू बनवण्यात त्यांची तयारी सुरू.(गोव्यात गणपती मध्ये करंज्या करून मुलीच्या सासरी देण्याची पद्धत आहे) कोकणात आणि गोव्यात माटोळी बांधतात त्याची तयारी पण सुरू होते.
गोव्यात आणि कोकणात जी मूळ घर असतात तिथेच गणपती बसतो आणि सगळे भाऊ-बहीण, काका काकू, त्यांची मुले जे कामानिमित्त शहरात गेलेले असतात ते यानिमित्ताने मूळ घरी येऊन एकत्र गणपती उत्सव आनंदाने गुण्यागोविंदाने साजरा करतात. म्हणूनच गणपती उत्सव म्हणजे नात्यांचा, उत्साहाचा जल्लोष.
आमच्या लहानपणी दहा- अकरा दिवसांचा ,अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती खूप जल्लोषात होत असे. सगळे शेजारचे मिळून आम्ही आरास करत असू. आरती तर खूप मोठी होत असे. आणि खूप मजा पण येई. गणपती विसर्जन करताना आम्हाला खूप वाईट वाटे, डोळेही पाणावत असे. अशा आमच्या लाडक्या गणपतीच्या आगमनाची सुरुवात आता सगळीकडे सुरू झाली आहे.
लेखिका रेखा डायस
गोवा

