
तूच माझ्या तन मन धनात
तूच भाव भावनात
तुच आमुच्या रक्तात
तूच आमुच्या शिलात
तूच संविधानात
सांगून सांगून संविधान प्रास्ताविक
विश्वास श्रध्दा ऊपासना स्वातंत्र्य दर्जाची संधीची समानता
तुच आमुचा भाग्य विधाता
राष्ट्रीय एकता एकात्मिक
स्वातंत्र्य समता बंधुता न्याय
आम्हास संविधानातून देणारा
तुच आमुचा आदर्श दाता
बाबासाहेब आंबेडकर
तूच कर्ता करविता
तुच संविधान निर्माता
तुजला कोटी कोटी प्रणाम
समतेचा
स्वातंत्र्याचा हक्क
शोषणा विरूद्ध हक्क
धार्मिक स्वांत्र्याचा हक्क
सांस्कृतिक शैक्षणिक हक्क
घटनात्मक उपाय योजनाचा हक्क
अधिकार मुलभूत हक्क मिळे
बाबा तुझ्याच चरणांवर
मस्तक आम्ही ठेवले
तूच आम्हास जीवन दिले
तुझ्यातच आम्ही सत्य मेव जयते पाहीले
तूच आमुच्या मनामनात
तू माझ्याच मनमंदिरात
भारतीय संविधानात
बाबा तुम्ही मनमंदिरात
कवियत्री वंदना नागणे शिंदे
मंगळवेढा














