prabodhini news logo
Home कविता आजची कविता – मन मंदिरात तू

आजची कविता – मन मंदिरात तू

0
109

मन मंदिरात मनाचे आव्हान
तूच सख्या मज संगे
राहे निरंतर नाही एकटे
होण्याचा भास स्वतःत रंगे //१//

क्षण प्रतीक्षन तू देतो ग्वाही
करण्यास उत्स्फूर्त करतो
कार्य निरंतर ही तुझी नवलाई
सुख दुःखात तूच स्मरतो //२//

तुला जगण्यास तूच आहे सहारा
ओळखून घे तुझाच तुला निवारा
तथागत आयुष्य मार्ग शोधण्यास
दिला मार्ग स्वतःचे आयुष्य उद्धार // ३//

बाहेरच्या जगात आहे साठवण
नको तिला ठेवू अंतर्मनात
एकटा रहा स्वतःच स्वतःशी तू
उमजून घे आयुष्य एकदाचे स्मरणात //४//

 कवयित्री- रंजना भैसारे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here