
माझ्या मन मंदिरात तु
साठवण तुझ्या प्रेमाची
होईल भेट जेव्हा हृदयाची
निःशब्द भावना ती मनाची… 1
जीवनाचा श्वास तु
मनात तुझीच मूर्ती
ठेवीन मी जपून
आठवणी स्वरूप कीर्ती… 2
स्वप्न माझे तूच असशी
सत्यात आस तुझी
मनी नित्य वसशी
देशील ना साथ तु माझी.. 3
हृदयी वसे छाया तुझी
जपेल मी ती अंतरी
मन मंदिरात तु
येशील ना सत्वरी… 4
चैतन्याचा आभास तु
फुलविलास जीवनात
विश्वासाच गोड बीज
रुजवीलस तु मनात… 5
आठवता तुझा आनंद
चांदण्यात मी रमले
मन मंदिरात तु
स्वप्न तुझेच सजले.. 6
कवयित्री सीमा गाडेकर
यवतमाळ















♥️