तू माझ्या मन मंदिरात
तू लहान थोरांच्या मनात
तू सर्वांच्याच घरादारात
तू विदेशातही सन्मानात…
तू प्रत्येकाच्या मनामनात
तू संविधानाच्या पानात
तू वंचिताच्या शिक्षणात
तू प्रत्येकाच्या घरादारात ….
तू ऑफिसच्या भिंतीवर
तू राज्यघटनेच्या कलमात
तू गीतकारांच्या गीतात
तू बुद्धाच्या धम्मग्रंथात…
तू त्रिशरणातील देशनात
तू आर्य अष्टांगिक मार्गात
तू पंचशीलेतील पंचतत्वात
तू धम्माच्या सा-या कार्यात…
तू अंतर्मनाच्या गाभाऱ्यात
तू बौद्ध बांधवाच्या विचारात
तू लहान थोरांच्या आचारात
तू पुस्तकाच्या पानापानात….
तू निवडणुकीच्या रिंगणात
तू बहुजनांच्या हिताहितात
तू प्रकाशाच्या प्रकाशात
तू वंचितांच्या ह्रदयात….
कवी प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी, जिल्हा गडचिरोली

