श्री. राष्ट्रसंत संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त माजी सैनिकांची मोफत सेवा

0
111


नंदुरबार प्रतिनिधी – त-हाडी:-दिनांक 31/8/2024 रोजी शनिवारी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त माजी सैनिक बांधवांची दाढी कटिंग मोफत करण्यात आली नंदुरबार येथील साई मेन्स पार्लर चे संचालक समाधान सैंदाणे यांनी दाढी कटिंग मोफत करण्याचे आयोजन केले होते जे सैनिक भारत मातेची सेवा करून सुखरूप सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांची दाढी कटिंग करून सेवा करून एक समाज सेवा करण्याच्या प्रयत्न केला. आणि दिवसभरात एकूण 25 माजी सैनिकांची कटिंग दाढी मोफत केली असे समाधान सैंदाणे यांनी सांगितले व यापूर्वीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 127 व्या निमित्त दोन दिवशीय उपक्रम बलवण गावात राबविण्यात आले होते व विश्व आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट रोजी पण एक दिवशी मोफत सेवा आदिवासी बांधव करिता हे उपक्रम केलेला आहे. समाधान सैंदाणे हे नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांना समाजसेवा करण्याची नेहमीच आवड आहे आपले आराध्य दैवत संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी हा छोटासा उपक्रम सेवा म्हणून राबविला आहे संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त तीन वेळा रक्तदान सुद्धा त्यांनी केलेले आहे त्यांचे जिल्हाभरातून व कर्मचारी संस्थांकडून कौतुक होत आहे यापुढेही ते म्हणाले नवीन काहीतरी समाजामध्ये उपक्रम आपण करत राहणार आहेत, त्यावेळेस संस्थेचे अध्यक्ष,पंकज भदाणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. समाधान सैंदाणे यांच्या उपक्रमासाठी खालील सर्व संचालक मंडळांनी दिवसभरात दुकानावर भेट दिली व समाधानचे अभिनंदन केले.
यावेळी हिमांशू बोरसे सचिव, अरवींद निकम, उपाध्यक्ष, नितीन मंडलिक उपाध्यक्ष, शिवाजी मिस्‍तरी कोषाध्यक्ष, छगन भदाणे सहसचिव, विजय सैदाणे जिल्हा संघटक, प्रकाश देवरे प्रसिद्धी प्रमुख, शशिकला सोनवणे संचालिका, एकनाथ चित्ते संचालक, प्रकाश सैदाणे संचालक छगन सुर्यवंशी संचालक ,नरेंद्र महाले संचालक, ओंकार शिरसाठ सल्लागार, प्रभाकर बोरसे सल्लागार समाधान सैदाणे युवा मोर्चा अध्यक्ष महिला जिल्हाध्यक्षा जयश्री निकम नवापूर, प्रभाकर चित्ते माजी सल्लागार, गजेंद्र जाधव माजी उपाध्यक्ष नंदुरबार, गुलाबराव पवार लोणखेडा नरेंद्र खोंडे धुळे विजय सोनवणे नंदुरबार सुधीर निकम नवापूर अनिल भदाणे निजामपूर मयूर सूर्यवंशी, नंदुरबार अनिता सूर्यवंशी नंदुरबार, प्रवीण वरसाळे, नंदुरबार, गणेश पवार, नंदुरबार लक्ष्मीकांत निकम नंदुरबार राजेश सूर्यवंशी, सेलंबा,मिनाक्षी भदाणे नंदुरबार, प्रभाकर शिरसाट नवापूर, लक्ष्मीकांत जाधव साक्री, कैलास ढवळे सावकार, राहुल ठाकरे ग्रामसेवक नंदुरबार, अमित सुर्यवंशी शेलंबा, नितीन भदाणे साक्री, ज्ञानेश्वर सोनवणे नंदुरबार, अर्जुन महाले तळोदा, ज्ञानेश्वर शिरसाट सेवानिवृत्त फौजी नंदुरबार तालुका अध्यक्ष, भाईदास बोरसे खोंडामळी तालुका उपाध्यक्ष,नीलिमा एकनाथ चित्ते, जीवन रतन जाधव रजाळे, मनीषा अरविंद निकम, जितेंद्र वेडू शिरसाट बँक मॅनेजर,संदीप सोनवणे नायब तहसिलदार, रोहित पंकज भदाणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here