फिरत्या गोमाता व नंदीबैल सोबत बैलपोळा साजरा

0
177


परभणी प्रतिनिधी – राष्ट्रजन प्राणिमित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणी प्रणित गौरक्षक सेना परभणी शाखेच्या वतीने हिंदू संस्कृतीतील बळीराजाचा सण शेतकऱ्यांचा म्हणजे बैल पोळा त्यानिमित्ताने परभणी शहरातील नंदीबैल व गोमाता गाय वासरू यांच्यासोबत सरकीची पेंड पोळी देऊन बैलपोळा उत्सव साजरा करण्यात आला इतर ठिकाणी बैलपोळा साजरा करण्याची संधी खेड्या गावात असते शहरांमधल्या लोकांनी गोशाळेमध्ये किंवा इतर आपल्या परिसरातील फिरते जे नंदीबैल गाय वासरू यांच्यासोबत साजरी करा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले होते त्याच अनुषंगाने आज दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी वसमत रोड रामकृष्ण नगर परिसर सायंकाळी साडेसहा वाजता गोमाता व नंदीबैल यांची सरकीची पेंड व पोळी देऊन पूजाअर्चा करून बैल पोळा उषा साजरा करण्यात आला याप्रसंगी बालकलाकार रुद्राक्ष आवटे बालगोपाल रितेश पाटील बैलपोळा महोत्सव संयोजक राष्ट्र जन प्राणी मित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन परभणीचे संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने फिरते गोमाता नंदी बैल यांच्यासोबत बैलपोळा साजरा करा असे प्रतिपादन करण्यात आले अशी माहिती गौरक्षक सेना परभणी जिल्हाप्रमुख गोरक्षक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here