सेक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्याची दादागिरी? सेतू केंद्राची लाईट कापली.

0
74
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}


रामनगर पोलीस स्टेशनं येथे सेतू केंद्र संचालकाची तक्रार

किशोर मडगूलवार जिल्हा संपादक, चंद्रपूर – बाहेरील प्रांतातील लोकांनी स्थानिक चंद्रपूर शहरात नजूलच्या जागावर कब्जा करून स्वतःच्या प्रापर्ट्या वाढविल्या आणि मराठी माणूस त्या प्रापर्ट्यात किरायाने राहत असल्याची विदारक परिस्थिती दिसत असून बाबुपेठ जुनोना चौक येथे नजूलच्या जागेवर मोठे बेकायदेशीर बांधकाम करून गाळे किरायाने देणाऱ्या व बोगस सेक्युरिटी कंपनी चालवून अनेक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या जावेद हुशेनची दादागिरी आता खूप वाढली असल्याचे दिसत आहे दरम्यान त्यांनी त्यांनी आपल्या चार ते पाच मुस्लिम साथीदारांना घेऊन चक्क किरायेदार यांच्या सेतू केंद्राची लाईट कापून सेतू केंद्र चालविणाऱ्या संचालक पियुष धुपे यांना दुकान खाली कर अन्यथा सामान बाहेर फेकून देईल व तुझा खेळ खल्लास करेन अशी धमकी दिली आहे, या संदर्भात पियुष धुपे यांनी रामनगर पोलिसाकडे तक्रार दिली आहे व हुसेन यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

जावेद हुशेन यांच्या नजूलच्या जागेवर बांधलेल्या जुनोना चौक आंबेडकर वार्ड बाबुपेठ चंद्रपूर येथील दुकान चाळीत पियुष धुपे हे सेतू केंद्र मागील 7 वर्षांपासून चालवीत असून ते नियमित किराया देत आहे, परंतु दरवर्षी पैसे वाढविण्यासाठी हुसेन सेतू केंद्र संचालक यांचेशी दरवर्षी झगडे भांडण करून शिवीगार करत असतो परंतु नेहमी प्रेमाने त्यांचेसोबत वागून पियुष धुपे हे व्यवसायाकडे लक्ष देतात त्याचाच फायदा उचलून दादागिरीवर उतरलेले हुशेन यांनी सेतू केंद्राची लाईट कापून कायदा हातात घेतला असल्याने त्यांचेसह त्यांच्या साथीदारावर गुन्हे दाखल होणे अपेक्षित आहे.

सेतू केंद्र अत्यावश्यक सेवेत असल्याने लाईट कापली कशी?

सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु असून त्यांचे फॉर्म हे सेतू केंद्रातून ऑनलाईन भरणे सुरु आहे त्यामुळे शेकडो महिला भगिनी आपल्या कागदपत्राच्या आधारे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म बाबुपेठ येथे भरत आहे,सोबतच शैक्षणिक सर्टिफिकेट सुद्धा इथे काढले जातं असल्याने सेतू केंद्र अत्यावश्यक सेवेत मोडते त्यामुळे त्या सेतू केंद्राची लाईट कापून ते सेतू केंद्र बंद पाडणे कायद्याने गंभीर गुन्हा असल्याने दादागिरीची भाषा करणाऱ्या हुशेन यांच्यावर अत्त्यावश्यक सेवा खंडित करणे या व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन येऊन दादागिरी करणे या सदराखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here