प्रश्नाची सोडवणुक न झाल्यास तिव्र आंदोलन – कृती समिती
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : विज निर्मीती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने खालील ९ कामगारांच्या जिव्हाळयाच्या मागण्याला घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये सहाही पावर स्टेशनमध्ये २० ऑगष्ट पासून आमरण उपोषण कंत्राटी कामगारांच्या वतिने सुरु करण्यात आलेले आहे. व २४ ऑगष्ट २०२४ पासून महाराष्ट्रातल्या सर्व पावर स्टेशनमध्ये काम बंद आंदोलन सुरु आहे. परंतु शासन प्रशासनाने तसेच उर्जामंत्री मा. देवेन्द्रजी फडणविस यांनी आंदोलनकर्त्या कंत्राटी कामगारांच्या खालील मागण्यांची दखल न घेता आज मिटींग लावू उद्या मिटींग लावू अशा प्रकारची थट्टा कंत्राटी कामगारांसोबत करीत आहे. परंतु हेच उर्जामंत्री मा. देवेन्द्रजी फडणविस यांनी कंत्राटी कामगारांच्या मार्च २०२४ ला सात दिवसांच्या आंदोलना दरम्यान ०९ मार्च २०२४ ला देवगीरी शासकिय बंगला नागपूर येथे महाराष्ट्राच्या सर्व कंत्राटी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून ४ ते ८ दिवसांमध्ये कंत्राटी कामगारांची मुंबईला बैठक बोलावून सर्वच प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिलेले होते. परंतु चार महिने कंत्राटी कामगारांनी वाट बघुन ना तर मिटींग घेण्यात आली ना तर प्रश्न निकाली काढण्यात आले. परंतु कंत्राटी कामगारांची शासन प्रशासनानी दिशाभूल केलेली आहे.
त्यांच्या ह्या विश्वासघाती कंत्राटी कामगार विरोधी धोरणाच्या निशेधार्थ सर्व विज निर्मितीमध्ये आंदोलन सुरु आहे. या आंदोलना दरम्यान चंद्रपूर विज निर्मीती केंद्रामधील संयुक्त कृती समितीचे कार्यकर्ता मान. हेरमनजी जोशब) यांची प्रकृती चिंताजनक होऊन त्यांना काल मध्यरात्री पोलीसातर्फे सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे आय.सी.यु. अती दक्षता विभागाच्या रुममध्ये भरती करण्यात आलेले आहे. व त्यांच सामान्य रुग्णालयामध्ये आमरण उपोषण सुरुच आहे. व आज दिनांक 31/08/2024 पासून कार्यकर्त्यांनी संयुक्त कृती समितीचे मा. लहुजी मरसकोल्हे यांची प्रकृती चिंताजनक आहे.
उपोषण सुरु केलेले आहे, ह्या सर्व आंदोलन कर्त्या कामगारांच्या मागण्या शासन प्रशासनाला माहिती असून तसेच अनेक लोकप्रतिनिधी यांनी मान. उर्जामंत्री देवेन्द्र फडणविस यांना दुरध्वनीवरुन मिटींग लावण्याबाबत विनंत्या करण्यात आल्या. परंतु त्या विनंती नौ देवेन्द्र फडणविस यांनी दुर्लक्ष्य केलेले आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या ह्या कामगार विरोधी कृत्यामुळे कामगारांच्या मनामध्ये प्रचंड चिड निर्माण झालेली आहे. व कामगारांच्या खालील मागण्या पुढीलप्रमाणे आहे.
(१) महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांना आज रोजी मिळत असलेल्या एकूण पगारात (बेसिक पूरक भत्ता र एप्रिल २३ पासून ३०% वेतनात वाढ करून देण्यात यावी.
(२) सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याप्रमाणे कंत्राटी कामगाराना समान कामास समान वेतन देण्यात यावे.
(३) मा. मनोज रानडे समितीच्या अहवार काटी कामगरीची तातडीने अंमलबजावणी करून महानिर्मिती मधील सर्व (कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार एन. एम. आर. च्या माध्यमातून देऊन नोकरीमध्ये सुरक्षा द्यावी व तसेच महानिर्मिती कंपनी कोणत्याही कंत्राटी कामगाराला काढणार नाही असे परिपत्रकमहानिर्मिती व्यवस्थापनाने त्वरित निर्गमित करावे.
(४) महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी ई. एस. आय. ची वेतन मर्यादा ओलांडली आहे त्यामुळे ई. एस. आय. चा (वैद्यकीय लाभ त्याना मिळत नाही तरी अतिरिक्त लाभ म्हणून मेडिक्लेम योजना सुरू करण्यात यावी.
(५) चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगार यांना नियमित कामगार प्रमाणे नक्षलग्रस्त भत्ता लागू करण्याबाबत.
(६) दी.९.३.२४ रोजी नागपूर येथे ना. उप मुख्यमंत्री मा. फडणवीस यांचेशी झालेल्या चर्चेत आश्वासन दिल्या प्रमाणे महानिर्मिती कंपनीच्या भरती परीक्षेत सेवेतील प्रत्येक ५ वर्षासाठी ५ गुण असे २५ गुण अतिरिक्त देण्यात यावे व ४५ वर्षाची वयोमर्यादा करण्यात यावी.
(७) नवीन पद्धतीचा महानिर्मिती कंपनीचा लोगों व नेमुद असलेल्या गेट पास रद्द करण्यात यावा व जुन्या पद्धतीचाच गेट पास सुरू ठेवावा.
८) खापरखेडा पॉवर स्टेशन मधील दिनांक ७ मार्च २४ या दिवशी गेटवरील संप आंदोलनात पोलिसांनी ज्या कंत्राटी (कामगारां वर खोटे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.
(९) महानिर्मितीमधील ऑटम वाईझ टेंडर व पद्धती रद्द करून लेबर कॉन्ट्रॅक्ट पद्धत सुरू करावी तसेच प्रशासनाने ३ नोव्हेंबर २३ ला ११२२० या क्रमांकाचे आणि २१ नोव्हेंबर २९२३ चे जे परिपत्रक काढले आहे त्यानुसार १०% कमी इन्स्ट्रमेंट आणि लेबर कपात करण्यात येते. त्या मधून लेबर कपात हे वगळण्यात यावे त्वरित थांबवण्यात यावे.
हया वरिल जिव्हाळयाच्या कंत्राटी कामगारांच्या मागण्या ताबडतोब बैठक बोलावून सोडविण्यात याव्या अन्यथा महाराष्ट्रभर विज निर्मीती कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरुन तिव्र स्वरुपाचे आंदोलन करणार व ह्या आंदोलनामध्ये शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उर्जा विभाग व शासन प्रशासनावर राहील.
आजच्या सभेचे प्रमुख पाहुणे मा. चैनदास भालाधरे अध्यक्ष महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती, मा. एडवोकेट सुनिता पाटील यांनी उपोषण भेट दिली.
अशा प्रकारचा ईसारा पत्रकार परिषदेत कृती समितीतर्फे मा. बंडू हजारे, मा. प्रमोद कोलारकर, मा. अमोल मेश्राम, मा. कॉ. वामन बुटले, मा. सदानंद देवगडे मा. निताई घोष, मा. युवराज मैंद, मा. सुधाकर तेलसे, मा. हेरमन जोसफ, मा. बंडू मडावी, मा.वामन मानकर, मा. सोमेश्वर सोरते, मा.रवि पवार यांची उपस्थित होती.

