तान्हा पोळा सजला
दिमाखात भारी
रंग रंगोटीही केली
सुंदर अशी खरी।।
लाकडी खेळण्यावर
दिसे सुंदर सुंदर नक्षी
झुलीवर छान छान असे
काढले चिमण्या पक्षी।।
लाकडाचा बैल म्हणून
फक्त खळणे नाही केले
तान्ह्या बैलपोळा म्हणून
खूप मान सन्मान दिले।।
लाकडी खेळणे म्हणून
लहान मुले खेळतात
मोठ्या मोठया बैलांचे
सुंदर अनुकरण करतात।।
शिंगाला छान रंगूवुन
पांघरले छान झुली
सोनेरी रंग भरून तिथं
सुंदर काढल्या मुली।।
तान्हा पोळा आहे सण
खरा बाळ गोपाळाचा
उल्हासित होऊन खेळतात
आहे आनंद त्यांच्या मनाचा।।
तान्हा पोळा पाहण्यासाठी
जमली पहा लहान थोर
आनंदाने नाचत राहतात
तरुण आणि लहानपोरं।।
प्रा. समिंदर निवृत्तीराव शिंदे, लातूर

