सम्राट अशोक सेनेची मागणी
अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा कसा कोसळला.?. याची चौकशी केली पाहिजे, ज्यांनी या पुतळ्यात भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही सम्राट अशोक सेने कडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिला आहे.आणि या घटनेचा आम्ही निषेध केला आहे.
काय तर म्हणे पुतळा कोसळला तुमच्यासाठी फक्त तो पुतळा असेल हो पण आमच्यासाठी आमचा बापच कोसळला आहे.ज्यांनी तो पुतळा बनवला त्याला फक्त एकदा एकदा रायगड दाखवला असता. हिरोजींची हे वास्तू दाखवली असती त्याला हे निष्ठा काय असते नक्कीच कळाली असती, राजे आम्हाला माफ करा तुमचा वापर फक्त या महाराष्ट्रात राजकारणासाठी करतात. तुमचे स्मारक बनवले जातात त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार केल्या जाते हे दुर्दैव आहे,*जे खरे छत्रपतींचे मावळे असतील त्यांनी या घटनेचा निषेध केला पाहिजे स्मारक कसं पडलं याची चौकशी झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा केला पाहिजे अन्यथा छत्रपतींचे नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही हे लक्षात असू द्या.. राजकारणासाठी छत्रपतींचा वापर करणं बंद करा, महाराष्ट्राची अस्मिता कोसळली याचा भान आणि याची जाण असू द्या.छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून समोर या तुमचा पक्ष हा नंतर एक मावळा म्हणून पहिले या घटनेचा तुम्ही निषेध करा हेच आवाहन करतो.

