परळी प्रतिनिधी:- परळी शहरातील भीम नगर येथील वार्ड क्रमांक तीन व चार मधील नागरिकांनी वयोश्री व तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की नुकतीच राज्यातील सर्व जाती धर्मीयातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना दिनांक 11 जुलै 2024 च्या शासनाच्या नवे मान्यता देण्यात आली असून या योजनेत देशातील 66 तीर्थक्षेत्राचा दर्शनाचे आयोजन म्हणजे आपल्या आवडीनुसार व इच्छेनुसार स्थळाची निवड करून यासाठी शासनाकडून वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून यासाठी जर आपणास एखाद्या सहाय्यकाची गरज पडली तर त्यास ही योजना लागू असून त्यासाठी ऑनलाइन अर्ज आधार कार्ड राशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र मतदान कार्ड टीसी ची झेरॉक्स उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र दोन पासपोर्ट फोटो जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर व हमीपत्र इत्यादीसाठी कागदपत्राची पूर्तता करून सदरील योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच जे नागरिक साठ वर्षापेक्षा जास्त असतील अशासाठी ही वयोश्री योजना लागू करण्यात आली असून यासाठीही चष्मा श्रवण यंत्र ऐकण्याची कानाची मशीन व्हीलचेअर स्टिक ट्रायपॅड होल्डिंग वॉकर क्लोज खुर्ची मी ब्रश कंबर बेल्ट सायकल कॉलर इत्यादीसाठी तीन हजार रुपये अनुदान देण्याची घोषणाही करण्यात आली असून तसेच राज्य शासनाने योगा केंद्र मनस्वस्थ केंद्र मनशक्ती केंद्र येथे सहभागी होता येते यासाठी दिनांक 31 12 2023 अखेर 65 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच या दोन्हीही योजनेचे मोफत फॉर्म भरून व वाटप करून दाखली करण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आव्हान वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व साप्ताहिक मानपत्रचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केले आहे

