प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, पुणे- कुठल्या ना कुठल्या कारणास्तव विविध प्रकारचे फसवणुकीचे प्रकार घडताना दिसून येत आहेत. असाच एक प्रकार आलेला कॉल मी सायबर क्राईम मधून बोलतोय तुम्ही गांजा विक्री करताय म्हणून आपल्या विरुद्ध तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे. येणारा कॉल हा फसवा असून त्यांच्या लक्षात येता नाव संजय कुमार हैदराबाद येथून बोलतोय असे सांगण्यात आले. ९७४७६८०३८८ याच फोन नंबर वरून कॉल आला होता. नागरिकांनी अशा फसव्या लोकांच्या भूलथापा मध्ये न अडकता जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा सायबर क्राईम यांच्याशी संपर्क साधावा संबंधित व्यक्तीविरुद्ध आप तर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करावा असे पत्रक देण्यात आले आम आदमी पार्टी शहराध्यक्ष अनुसूचित जाती प्रशांत कांबळे यांनी आवाहन केले आहे.

