प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर : चंद्रपूर- बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरती अष्टभुजा ब्रिज जवळ मागील अनेक वर्षांपासून रेल्वे ब्रिजच्या अर्धवट कामामुळे तसेच स्ट्रीट लाईटच्या अभावामुळे तसेच पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे अंधारात अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे यांच्या वतीने स्ट्रीट लाईट, सर्विस रोड, आणि ब्रिज चे काम तात्काळ सुरु करण्याकरिता अनेक आंदोलने करण्यात आली तत्पूर्वी स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी मनपा ने मान्य करून ती पुर्णत्वास आली.
यामुळे रात्री बेरात्री प्रवास करणाऱ्या दुचाकी प्रवाश्याना दिलासा मिळाला असून अपघातापासून अनेकांचे प्राण सुद्दा वाचतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून याकरिता जनतेनी राजु कुडे आणि आम आदमी पार्टीचे चे आभार
मानले आहे. तर ब्रिजचे काम आणि सर्विस रोड करिता टोल कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्याकरीता सुद्धा जनतेला सोबत घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून
मागणी रेटून धरू असे राजु कुंडे यांनी प्रेस चे माध्यमातून व्यक्त केले.

